IMPIMP

Pune Corporation | पुणे मनपाच्या स्थायी समितीने अखेरच्या बैठकीत 2500 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना एकमताने दिली मान्यता; नदी सुधार, नदी काठ सुधार, पीपीपी तत्वावरील रस्त्यांच्या कामांचे कोट्यवधींचे प्रस्ताव मंजूर

लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते भुमिपूजन करून कामांचा शुभारंभ करणार - हेमंत रासने, स्थायी समिती अध्यक्ष

by nagesh
Pune PMC News | Strict enforcement of plastic bag ban! On the first day itself, PMC took action against 14 traders and seized 391 KG plastic bags Single Use Plastic Ban

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Corporation | पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने (PMC Standing Committee) आज शेवटच्या बैठकीमध्ये आगामी निवडणुकीच्या (PMC Elections) अजेंड्यावरील नदी सुधार (Pune River Rejuvenation Project), नदी काठ सुधार (Mula Mutha River Rejuvenation Project) आणि पीपीपी Purchasing Power Parity (PPP) तत्वावरील रस्त्यांच्या कामांसह सुमारे २ हजार ५०० कोटी रुपयांच्या निविदांना मंजुरी दिली. महापालिकेच्या (Pune Corporation) इतिहासात एकाच बैठकीमध्ये एवढ्या मोठ्या रकमेच्या प्रकल्पांच्या निविदांना जेमतेम तासाभराच्या बैठकीमध्ये ‘एकमताने’ मंजुरी देण्याची ही बहुधा ही पहिलीच वेळ आहे. पुणे शहराच्या दृष्टीने हे सर्व प्रकल्प महत्वाचे असून विकासाच्या कामांत (Development Work) सर्वपक्ष एकच भुमिका घेतल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) आणि स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने (PMC Standing Committee Chairman Hemant Rasne) यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

नदी सुधार योजना
नदी सुधार योजनेअंतर्गत (Pune Riverfront Development) जायका कंपनीच्या Japan International Cooperation Agency (JICA) सहकार्यातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून शहरात गोळा होणार्‍या मैलापाण्यावर प्रक्रिया (PMC Sewage Treatment Plants) करून ते नदी पात्रात सोडण्यात येणार आहे. यासाठी ११ ठीकाणी एसटीपी प्लँट (PMC STP) उभारण्यात येणार आहे. सुमारे ७ वर्षांपासून विविध कारणास्तव रेंगाळलेल्या या योजनेला जायका कंपनीने केंद्राला ९५० कोटी रुपये कर्ज अल्पदरात दिले असून केंद्र शासनाने (Central Government) ते महापालिकेला अनुदान (Grant to Pune Municipal Corporation)स्वरुपात उपलब्ध करून दिले आहे. या कामासाठी १ हजार ४७३ कोटी रुपयांची निविदा (Tender) मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे होती. या निविदेला आज मंजुरी देण्यात आली. प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून ८५ टक्के अनुदान मिळणार आहे तर १५ टक्के खर्च महापालिकेला करायचा आहे. प्रकल्पाचा खर्च वाढल्याने वाढीव खर्चाच्या ८५ टक्के रक्कमही उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी दिली. (Pune Corporation)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नदी काठ सुधार योजनेतील दोन टप्प्यांतील ८६५ कोटी रुपयांच्या निविदांना मान्यता
मुळा-मुठा नदी काठ सुधार योजनेअंतर्गत (Mula Mutha Riverfront Development Project) ४४ कि.मी.चा नदीकाठाचे शास्त्रोक्त सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. सुमारे ४ हजार ७०० कोटी रुपये खर्चाच्या ११ टप्प्यात राबविण्यात येणार्‍या या प्रकल्पासाठी संगमवाडी ते बंडगार्डन दरम्यानचा पहिला टप्पा महापालिकेच्या खर्चातून करण्यात येणार आहे. तर उर्वरीत टप्पे पीपीपी तत्वावर क्रेडीट नोटच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. यापैकी संगमवाडी ते बंडगार्डन (Sangamwadi To Bundgarden) दरम्यानच्या कामाची २६५ कोटी रुपयांची बी.जी. शिर्के कंपनीची (BG Shirke Construction Technology PVT) निविदा मान्य करण्यात आली. तसेच बंडगार्डन ते मुंढवा (Bundgarden To Mundhwa) दरम्यानची पीपीपी तत्वावरील ६०० कोटी रुपयांची जे.कुमार (J. Kumar Infra) या कंपनीची निविदा मान्य करण्यात आली. बी.जे. शिर्के कंपनीची निविदा १३.१४ टक्के कमी दराने आली आहे. तर दुसर्‍या टप्प्यातील कामाची जे.कुमार या कंपनीची निविदा ही एस्टीमेट कॉस्ट (Estimate Cost) एवढीच असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पीपीपी तत्वावरील ८ रस्ते व नदीवरील पुलांच्या १३५ कोटी रुपयांच्या निविदांना मंजुरी
खराडी – मुंढवा (Kharadi – Mundhwa) येथील ८ डीपी रस्ते व खराडी व मुंढवा नदीवरील पुलाच्या कामांच्या १३५ कोटी रुपये खर्चाच्या निविदांना स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली. पीपीपी तत्वावर विकसित करणारे हे रस्ते व नदीवरील पुलांच्या कामांमुळे या परिसरातील वाहतुकीचा प्रश्‍न सुटणार आहे. पीपीपी तत्वावर क्रेडीट बॉन्डच्या माध्यमांतून करण्यात येणार्‍या कामांचे पेमेंट करताना महापालिकेने प्रत्येक वर्षासाठी २०० कोटी रुपयांची कॅप घातली आहे. त्यामुळे महापालिकेवर फारसा आर्थिक बोजा पडणार नसून शहराची गरज असलेले प्रकल्प उभारण्यास मदत होणार असल्याचेही रासने यांनी नमूद केले.

 

शहराच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या प्रकल्पांना स्थायी समितीमध्ये सर्व पक्षांनी एकमताने मंजुरी दिली. बाहेर राजकिय भुमिका वेगवेगळी मांडली जात असली तरी शहराच्या विकासासाठी सभागृहात सर्वपक्ष एकत्र येतात, हेच यातून दिसून येते. येत्या ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पांचे भुमिपूजन तसेच महत्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाचे उदघाटन होणार आहे.

– मुरलीधर मोहोळ, महापौर
शहराच्या विकासाच्या दृष्टीने आणि पर्यावरणाच्या दृष्टीने नदी सुधार आणि नदी काठ सुधारसारखे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. हे दोन्ही महत्वाकांक्षी प्रकल्प असुन सर्व राजकिय पक्षांनी याला पाठींबा देत भाजपच्या विकासाच्या भुमिकेला पाठींबा दिला. हे प्रकल्प वेळेत पुर्ण होतील आणि अन्य शहरांना मार्गदर्शक ठरतील.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

– गणेश बिडकर, सभागृह नेता (Ganesh Bidkar, PMC Leader of the House)
मुळा, मुठा नदीची सुधारणा करण्याबाबत गेली अनेकवर्षे चर्चा सुरू होती.
केंद्रीय मंत्री असताना प्रलंबीत असलेला नदी सुधार प्रकल्पाची फाईल मी वर काढली.
या प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा केला.
केंद्राने जायका कंपनीच्या माध्यमातून महापालिकेला निधी उपलब्ध करून देण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेतला.
या प्रकल्पाचे काम सुरू होत असल्याने निश्‍चितच आनंद होत आहे.
प्रकल्प पुर्ण झाल्यानंतर मुळा, मुठा नदीमध्ये मैलापाणी येणार नाही.
पुण्याचा अनेक वर्षांचा प्रश्‍न सोडवण्याचे भाग्य मला लाभले यासारखा आनंद कुठलाच नाही.

 

– खासदार प्रकाश जावडेकर (MP Prakash Javadekar)

 

Web Title :- Pune Corporation | Pune Municipal Corporation Standing Committee unanimously approved proposals worth Rs. 2500 crore in its last meeting; Billions proposed forPune River Rejuvenation Project, PPP road works

 

हे देखील वाचा :

Pune NCP | ‘5 वर्षे तुमची सत्ता होती, तुमचे मालक गृहमंत्री होते, तेव्हा का नाही सुचलं हे शहाणपण?’ पुणे राष्ट्रवादीचा चंद्रकांत पाटलांना सवाल

Raj Thackeray | मनसेचा 16 वा वर्धापनदिन पुण्यात ‘या’ ठिकाणी होणार साजरा.

Atal Pension Yojana (APY) | रोज 17 रुपयांच्या बचतीने मिळवा 10,000 रुपये दरमहिना, जाणून घ्या ‘या’ सरकारी योजनेबाबत

 

Related Posts