IMPIMP

Atal Pension Yojana (APY) | रोज 17 रुपयांच्या बचतीने मिळवा 10,000 रुपये दरमहिना, जाणून घ्या ‘या’ सरकारी योजनेबाबत

by nagesh
atal pension yojana apy atal pension yojana apy get 5k rupees every month central modi government scheme

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Atal Pension Yojana (APY) | जर तुम्हीही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि अशा सरकारी योजनेच्या शोधात असाल ज्यामध्ये तुम्हाला सुरक्षिततेसह चांगला रिटर्न मिळेल, तर तुम्ही अटल पेन्शन योजना Atal Pension Yojana (APY) या सरकारी योजनेत पैसे गुंतवू शकता. अटल पेन्शन योजना 2015 मध्ये असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या लोकांसाठी सुरू करण्यात आली होती, परंतु या योजनेत बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते (Post Office Account) आहे असा 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक पेन्शनचा (Pension) लाभ घेऊ शकतो. या योजनेत ठेवीदारांना 60 वर्षांनंतर पेन्शन मिळू लागते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काय आहे अटल पेन्शन योजना?

अटल पेन्शन योजनेत तुम्ही केलेली गुंतवणूक तुमच्या वयावर अवलंबून असते. या योजनेंतर्गत किमान मासिक 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये आणि कमाल 5000 रुपये निवृत्ती वेतन मिळू शकते. तुम्हाला या पेन्शन योजनेसाठी नोंदणी करायची असेल, तर तुमच्याकडे बचत खाते, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे. (Atal Pension Yojana (APY)

 

योजनेचा लाभ :

तुम्ही जितक्या लवकर अटल पेन्शन योजनेत सामील व्हाल तितके जास्त फायदे तुम्हाला मिळतील. जर एखादी व्यक्ती वयाच्या 18 व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत सामील झाली तर त्याला वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 5000 रुपये मासिक पेन्शनसाठी 210 रुपये जमा करावे लागतील.

 

कसे मिळतील दरमहा 10,000 रुपये :

जर एखादी व्यक्ती वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील झाली तर वयाच्या 60 व्या वर्षी त्याला दरमहा 5,000 रुपये मासिक पेन्शनसाठी (Monthly Pension) फक्त 210 रुपये प्रति महिना जमा करावे लागतील. त्याच वेळी, 39 वर्षांपेक्षा कमी वयाचे पती-पत्नी स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतात, ज्यातून 60 वर्षांनंतर, त्यांना एकत्रितपणे प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये पेन्शन मिळेल.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

यामागील गणित समजून घ्या :

या योजनेत दरमहा 1000 रुपये मासिक पेन्शनसाठी दरमहा केवळ 42 रुपये जमा करावे लागतील. दुसरीकडे 2000 रुपयांच्या पेन्शनसाठी 84 रुपये, 3000 रुपयांसाठी 126 रुपये आणि 4000 रुपयांच्या मासिक पेन्शनसाठी 168 रुपये दरमहा जमा करावे लागतील.

 

करात सुद्धा मिळतो लाभ :

अटल पेन्शन योजनेत (APY) गुंतवणूक करणार्‍यांना प्राप्तीकर कायदा (Income Tax Act)
80सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर लाभ (Tax Benefit) मिळतो.
यातून ग्राहकांचे करपात्र उत्पन्न वजा केले जाते. याशिवाय,
विशेष प्रकरणांमध्ये 50,000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त कर लाभ उपलब्ध आहे.
अशा प्रकारे, या योजनेत 2 लाख रुपयांपर्यंतची वजावट उपलब्ध आहे. (Tax Benefit Of APY)

 

Web Title :- Atal Pension Yojana (APY) | atal pension yojana get benefits of 10000 per month by investing rs 17

 

हे देखील वाचा :

Supreme Court | सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय ! म्हटले – ‘कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर दुसर्‍या पत्नीपासून झालेले मुल अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र’

Gold-Silver Rates Today | …म्हणून सोनं झालं स्वस्त, चांदीच्या किंमतीत तब्बल 3 हजार रूपयांची घसरण

Maharashtra Police | राज्यातील हजारो पोलिसांसाठी खुशखबर ! पोलीस अंमलदारांना मिळणार पदोन्नतीची संधी; PSI बनणार, शासन निर्णय जारी

 

Related Posts