IMPIMP

Pune Corporation | पुणे महापालिकेची ‘टॉयलेट’ कथा ! ‘मलिदा’ घेऊन बिल्डरच्या फायद्यासाठी 20 लाख रुपये खर्चून उभारलेले ‘स्वछतागृह’ मध्यरात्री ‘जमीनदोस्त’

by nagesh
Pune Corporation | Pune Municipal Corporation's toilet story, may be builder give money to pmc officer

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Corporation | गंगाधाम चौकातून (gangadham chowk bibwewadi) शत्रूंजय मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या डीपी रस्त्याच्या (DP Road) कडेला 2015-16 मध्ये 20 लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेले पुरुष – महिलांचे स्वछतागृह (toilet) कुठलीही पर्यायी व्यवस्था न करता मध्यरात्री जमीनदोस्त करण्यात आले. विशेष असे की 2018 मध्ये ‘स्वछतागृह’ रस्ता रुंदीकरणात येत असल्याने पाडून टाकावे असा प्रस्ताव स्थानिक नगरसेवकांनी दिला आहे. हे स्वछतागृह एका ‘बड्या बिल्डरच्या’ मोठ्या साईटच्या प्रवेशद्वारालगतच असल्याने ते पाडून टाकले . यामध्ये पालिकेच्या (Pune Corporation) अधिकाऱ्यांना मोठा ‘मलिदा’ मिळाला असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

महापालिकेच्या (Pune Corporation) वतीने 2015 – 16 मध्ये बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने 20 लाख रुपये खर्चून पुरुष आणि महिलांसाठी 10 सीटचे स्वच्छतागृह (ladies and gents toilet ) बांधण्यात आले होते. भर वर्दळीच्या परिसरात सुविधा निर्माण करण्याच्या हेतूने हे उभारण्यात आले होत्ते.
विशेष असे की बांधल्यानंतर काहीच दिवसांत समाज कंटकांनी तोडफोड केल्याची तक्रारही बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यलयाने (Bibwewadi Regional Office) पोलिसात दिली होती.
परंतु काही सामाजिक संघटनांनी हे स्वच्छतागृह (PMC Toilet) सुरू करावे यासाठी आंदलनेही केली.

 

दरम्यान 2017 मध्ये शासनाने मंजूर केलेल्या विकास आराखड्यात हा रस्ता 24 मी. वरून 30 मी. रुंद करण्यात आला.
ज्यावेळी प्रारूप आराखडा तयार करण्यात आला होता त्यामध्ये हा रस्ता 30 मी. रुंदीचाच सुचविण्यात आला होता.
असे असताना देखील बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यलयाने 24 मी. रुंद रस्त्यावर स्वछतागृह उभारले.
या स्वछतागुहा मागे एका ‘प्रतियश’ बिल्डरच्या शहरातील बहुधा सर्वात मोठ्या बांधकाम साईटचे काम गेल्या अनेकवर्षापासून सुरू आहे.

 

विकास आराखड्यात (development plan) रस्तारुंदी मंजूर झाल्यानंतर महापालिका (Pune Corporation) स्वतः स्वछतागृह पाडू शकली असती.
परंतु रस्ता रुंदीचे कारण देत स्थानिक नागरसेवकांनीच महिला व बालकल्याण समितीपुढे (Women and Child Welfare Committee) स्वच्छतागृह पाडण्यासाठी प्रस्ताव ठेवला.
समितीने तो मंजूरही केला. यावर पथ विभाग, आरोग्य विभागासह सर्वच विभागांनी स्वच्छतागृह रस्ता रुंदीकरणात येत असल्याने व वापरात नसल्याने पाडून टाकण्यास हरकत नाही असा अभिप्राय दिला आहे. त्यानुसार अगदी क्षेत्रीय अधिकारी, झोनल उपयुक्त आणि अतिरक्त आयुक्तांनीही अभिप्रायाला अनुसरून स्वछतागृह पाडण्यास परवानगी दिली आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दरम्यान 2 नोव्हेंबर ला रात्री 12 वाजल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने स्वछतागृह पाडण्यात आले. स्थानिक नागरिकांना सुगावा लागल्यानंतर अर्धवट काम थांबवण्यात आले.
काल राडारोडा उचलण्यासाठी वाहने आल्यानंतर पुन्हा विरोध झाल्यानंतर पुन्हा काम थांबवण्यात आले आहे.

 

 

परंतु यावरून स्थानिक नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. येथून काही अंतरावर असलेल्या आनंदनगर वसाहतीतील नागरिक वसाहतीतील स्वचतागृह खराब असेल त्यावेळी पर्याय म्हणून या स्वछतागृहाचा वापर करत असत.
हे स्वछतागृह पाडण्यापूर्वी महिला व बालकल्याण समितीच्या ठरावा प्रमाणे पर्यायी व्यवस्था म्हणून येथील खिंडीतील रस्त्यावर स्वछता गृह उभारणे गरजेचे होते. परंतु ते देखील उभारलेले नाही.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

पालिकेचे (Pune Corporation) अधिकारी सांगतात येथे लगतच असलेल्या अग्निशामक केंद्राच्या (Pune fire brigade) आतील बाजूस स्वछतागृह उभारण्यात आले आहे.
परंतु नुकतेच 2 नोव्हेंबर ला अग्निशामक दलातील आतील बाजूस स्वछतागृह उभारण्यासाठीचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले आहे.
तसेच दिवाळीची सुट्टी असताना स्वछतागृह पाडण्यासाठी पालिकेचे अधिकारी कसे उपस्थित राहिले, हा संशोधनाचा विषय आहे.
त्यामुळे एकंदरच स्वछतागृह पाडण्यामागील ‘उद्देशावरून’ बिबवेवाडी परिसरात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
स्वछता गृह बांधण्याचा आणि पाडण्याचा खर्च संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

 

Web Title : Pune Corporation | Pune Municipal Corporation’s toilet story, may be builder give money to pmc officer

 

हे देखील वाचा :

ST Workers Agitation | ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार ! एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात मनसे मैदानात उतरणार

Pune Crime | हडपसरमध्ये ‘दिवाळी बोनस’ मागितल्याने तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune Crime | ‘आमच्या घरी आजवर पोलीस आले नव्हते, म्हणणार्‍यांना पडल्या बेड्या’; जाणून घ्या पुण्यात भल्या पहाटे नेमकं काय घडलं

 

 

Related Posts