IMPIMP

Pune Crime | Cpoints अ‍ॅपची लिंक पाठवून क्रेडिट कार्ड खात्यातून काढले 2 लाख रुपये, आर्थिक फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील व्यक्तीवर FIR

by nagesh
Pune Crime | 2 lakh withdrawn from credit card account by sending link to Cpoints app, FIR against person in Delhi for financial fraud

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | राज्यात सायबर गुन्हे (Cyber Crime) आणि ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या (Financial Fraud) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पहायला मिळत आहे. फसवणूक करणाऱ्या व्यक्ती आता ऑनलाइन लोकांची शिकार करुन त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करत आहेत. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील एका व्यक्तीच्या क्रेडिट कार्ड खात्यातून 2 लाख रुपये ऑनलाइन काढून घेत आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस (Pune Crime) आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत सागर मनोहर धावडे Sagar Manohar Dhwade (वय-46 रा. वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद दिली आहे. धावडे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी दिल्ली येथील सागर शर्मा (Sagar Sharma) याच्या विरुद्ध आयपीसी 419, 420, आयटी अ‍ॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार 8 जानेवारी 2022 रोजी दुपारी सव्वादोन ते रात्री साडेनऊच्या दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी तक्रार अर्जाची चौकशी करुन गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर शर्मा याने फिर्यादी यांच्या मोबाईलवर www.cpoints.online ही लिंक पाठवली.
या लिंकच्या माध्यमातून आरोपीने one mobikwik systems या अ‍ॅपचा वापर करुन फिर्यादी यांच्या
क्रेडिट कार्ड खात्यातून (Credit Card Account) 2 लाख 16 हजार 753 रुपये ऑनलाइन काढून घेतले.
हा प्रकार फिर्यादी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लोणीकंद पोलिसांकडे तक्रार अर्ज केला.
फिर्यादी यांच्या तक्रार अर्जाची चौकशी करुन बुधवारी (दि.5) गुन्हा दाखल केला.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे पाटील (Police Inspector Patil) करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | 2 lakh withdrawn from credit card account by sending link to Cpoints app, FIR against person in Delhi for financial fraud

 

 

हे देखील वाचा :

Women’s T20 Asia Cup 2022 | महिला आशिया चषकात भारतीय महिला वरचढ, जाणून घ्या बाकीच्या संघाची स्थिती

LIC Jeevan Umang Policy | LIC च्या या योजनेत दरमहिना 1302 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला देऊ शकते 27 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम, जाणून घ्या

Beed Crime | प्रेमाचे नाटक करुन महिला पोलीस अंमलदारावर अत्याचार, ब्लॅकमेल करत उकळले तब्बल 13 लाख

Related Posts