IMPIMP

Pune Crime | कुंजीरवाडी येथील यात्रेत आलेल्या तरुणाला गुंडाच्या टोळक्याने केली जबर मारहाण; योगेश लोंढे, अभिषेक खेंगरे, शुभम धुमाळ, करण गावडे यांच्यावर गुन्हा

by nagesh
Chhatrapati Sambhajinagar Crime News | lodge owner and his son were brutally beaten up by mob for not allowing them to go to the toilet vaizapur

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | कुंजीरवाडी येथील गावाच्या यात्रेला मित्राच्या घरी आलेल्या तरुणाला गुंडाच्या टोळक्याने लाकडी दांडक्याने मारहाण करुन जबर जखमी केले. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी अजय शाम विश्वकर्मा (वय २१, रा. तरडे रोड, हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी योगेश शांताराम लोंढे, अभिषेक बापू खेंगरे (दोघे रा. कुंजीरवाडी, हवेली), शुभम संदीप धुमाळ (रा. थेऊर फाटा), करण गावडे (रा. म्हातोबाची आळंदी, हवेली) यांच्यावर गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे. ही घटना कुंजीरवाडी येथील माळवाडी चौकात ११ मार्च रोजी रात्री अकरा वाजता घडली होती. योगेश लोंढे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Pune Criminals) आहे.

 

कुंजीरवाडी गावाची यात्रा असल्याने अजय विश्वकर्मा हे त्याचे मित्र शुभम लोंढे याच्या घरी जेवणासाठी आले होते.
जेवण करुन घरी परत जाण्यासाठी निघाले होते. कुंजीरवाडी येथे पार्किंगला लावलेली मोटारसायकल काढत असताना आरोपी तेथे आले.
त्यांनी काही एक कारण नसताना तू चौकात का आलास, परत चौकात दिसायचे नाही, असे म्हणून शिवीगाळ करुन हाताने मारहाण करु लागले.
हे पाहून अमर चौधरी व शुभम लोंढे हे मध्ये आले.
तेव्हा योगेश लोंढे याने तेथे पडलेल्या लाकडी दांडक्याने फिर्यादी व शुभम लोंढे यांना मारहाण केली.
अभिषेक खेंगरे याने तेथे पडलेल्या दगड अमर चौधरी याच्या डोक्यात मारला. इतरांनी हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले.

 

Web Title :- Pune Crime | A young man on a pilgrimage to Kunjirwadi was severely beaten by a gang of thugs Crimes against Yogesh Londhe Abhishek Khengare Shubham Dhumal and Karan Gawde

 

हे देखील वाचा :

Buldhana Accident | देवदर्शनासाठी जाणार्‍या भाविकांवर घाला ; ट्रकची जीपला धडक, 5 भाविक जागीच ठार, 7 गंभीर जखमी

MBBS Exam In Latur Medical College | एमबीबीएसचा पेपर केला रद्द ! महाविद्यालयाचा भोंगळ कारभार, मुळ पेपरच दिला सराव परीक्षेला, 4 महिन्यापूर्वीच फुटला पेपर

HSC Exam Paper Leak Case | आणखी एक पेपरफुटी प्रकरण उघड ! बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फोडणार्‍या शिक्षकाला अटक

 

Related Posts