IMPIMP

MBBS Exam In Latur Medical College | एमबीबीएसचा पेपर केला रद्द ! महाविद्यालयाचा भोंगळ कारभार, मुळ पेपरच दिला सराव परीक्षेला, 4 महिन्यापूर्वीच फुटला पेपर

by nagesh
Maharashtra Monsoon Session | mpsc exam and bed cet exams on same day both exams on august 21 govt gave solution

लातूर : सरकारसत्ता ऑनलाइनMBBS Exam In Latur Medical College | एमबीबीएसचा (MBBS) द्वितीय वर्षाचा मायक्रो बायोलॉजीचा पेपर
(Microbiology Exam Paper) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (Maharashtra University of Health Sciences) आता रद्द केला आहे. या
विषयाची फेरपरीक्षा येत्या २६ मार्च रोजी होणार आहे. पण, ही परीक्षा का रद्द केली, याचे कारण जाणून घेतले तर विद्यापीठाचा कारभार किती भोंगळ आहे हे लक्षात येईल. (MBBS Exam In Latur Medical College)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Vilasrao Deshmukh Government Institute Of Medical Sciences, Latur) हा पेपर ४ महिन्यांपूर्वीच फुटला होता. हा प्रकार आता लक्षात आला आहे. त्याचे झाले असे की वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या हिवाळी परीक्षा सध्या सुरु आहेत. या परिक्षेत एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या मायक्रोबायोलॉजी या विषयाचा शुक्रवारी दुपारी पेपर होता. लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या हातात पेपर पडला. पेपर पाहून विद्यार्थ्यांना आर्श्चयाचा धक्काच बसला. याचे कारण म्हणजे त्यांना दिलेला पेपर हा अगदी जसाच्या तसा नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सराव परीक्षेत आला होता. (MBBS Exam In Latur Medical College)

 

मायक्रोबायोलॉजी या विषयाचा पेपर तयार करण्याची जबाबदारी या महाविद्यालयातील संबंधित प्राध्यापकांवर सोपविली होती.
त्यांनी मुळ परीक्षेसाठी तयार केलेला पेपरच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सराव परीक्षेसाठी दिल्याचे समोर आले आहे.
सध्या ही परीक्षा रद्द करण्यात आली असून विद्यापीठाने चौकशीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आता ही परीक्षा रद्द केली असून २६ मार्च रोजी फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.

 

Web Title :- MBBS Exam In Latur Medical College | MBBS paper was torn in latur it was revealed that only the paper given to the Maharashtra University of Health Sciences had taken the practice test four months ago

 

हे देखील वाचा :

HSC Exam Paper Leak Case | आणखी एक पेपरफुटी प्रकरण उघड ! बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फोडणार्‍या शिक्षकाला अटक

Nandurbar Police | मुलाने महिलेला पळवल्याच्या रागातून वडिलांना पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, 5 आरोपींना नंदुरबार पोलिसांनी केली अटक

Pune Corporation | पुणे महानगरपालिकेत कायद्यानुसार सहावे बजेट (PMC Budget) कोणालाही सादर करता येत नाही – NCP

 

Related Posts