IMPIMP

Pune Crime | उधार सिगारेट न दिल्याने मुलावर कोयत्याने सपासप वार, 4 जणांवर FIR

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Duttawadi Police Station - Gang tried to kill youths by stabbing them as friends ran away

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | अगोदर घेतलेल्या सिगारेटचे पैसे न दिल्याने पुन्हा सिगारेट देण्यास नकार दिल्याने चौघा जणांच्या टोळक्याने पान टपरीवर दगडफेक केली. पानटपरी चालकाच्या मुलावर कोयता व पालघने वार (Pune Crime) करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला.

 

याप्रकरणी ओमप्रकाश विद्याधर शुक्ला Omprakash Vidyadhar Shukla (वय ४७, रा. गांधीनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४८६/२२) दिली आहे. त्यावरुन चौघा टोळक्यांविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार येरवड्यातील गांधीनगर कॉर्नरवरील शिवशक्ती पान शॉप या दुकानात ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमप्रकाश शुक्ला यांची शिवशक्ती पान शॉप ही पानटपरी आहे.
त्यांच्या पान टपरीत येऊन चौघे मुले सिगारेट घेऊन जात़ पैशांची मागणी केल्यावर शिवीगाळ करुन मारहाणीची धमकी देत. हे टोळके ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आले. त्यांनी पैशाशिवाय सिगारेट देण्यास नकार दिला. तेव्हा त्यांनी पानटपरीवर दगडफेक करुन पळून गेले. त्यानंतर साडेसात वाजता पुन्हा आले. फिर्यादी यांचा मुलगा अनुराग शुक्ला यांच्या डोक्यात कोयता व पालघनने वार करुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
पोलीस उपनिरीक्षक गुरव तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Boy stabbed with a knife for not giving borrowed cigarettes, FIR against 4 persons

 

हे देखील वाचा :

Pune Crime | हॉर्न वाजविल्याने तरुणाच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार, कसबा पेठेतील घटना

Samata Party | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या निशाणी ‘मशाल’वर समता पक्षाचा आक्षेप

Andheri By-Election | नवी खेळी! एकनाथ शिंदे शिवसेनेला अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत

India vs SA | दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सिरीज जिंकून भारताने ऑस्ट्रेलियाच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी

 

Related Posts