IMPIMP

Andheri By-Election | नवी खेळी! एकनाथ शिंदे शिवसेनेला अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत

by nagesh
Andheri By-Election | double crisis facing uddhav thackeray before andheri by election cm eknath shindes try to nominate rituja latke by balasahebanchi shivsena

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गट (Shinde Group) प्रथमच अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri By-
Election) आमने-सामने येण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे भाजपासुद्धा (BJP) येथे उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे. दरम्यान शिंदे गटाचे
प्रमुख एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे पोटनिवडणुकीपूर्वी (Andheri By-Election) शिवसेनेचा उमेदवारच पळविण्याच्या तयारीला लागले आहेत. येथील शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना शिंदे गटात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे. शिंदेंच्या या नव्या खेळीने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर दुहेरी संकट येऊ शकते.

 

शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेने उमेदवारी घोषीत केली आहे. मात्र, एकनाथ शिंदे त्यांना आपल्या गटात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ऋतुजा लटकेंचा राजीनामा मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) मंजूर झालेला नाही. त्या अजूनही प्रशासकीय सेवेत आहेत त्यामुळे नवा पेच निर्माण करण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अंधेरी पोटनिवडणुक (Andheri By-Election) ही मुंबई महापालिका निवडणुकीची रंगीत तालिम ठरणार आहे, शिवाय शिवसेनेत बंडखोरी करणार्‍या शिंदे गटाला मतदारांनी स्वीकारले आहे किंवा नाही हे दखील या निवडणुकीच्या निकाला नंतरच ठरणार आहे. यामुळे ही निवडणूक कशीही करून जिंकायचीच, यासाठी शिंदे गटाच्या राजकीय खेळ्या सुरू आहेत.

 

दरम्यान, भाजपा येथे मुरजी पटेल यांना उमेदवारी देणार असले तरी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही,
तसे भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी सांगितले आहे.
तर शिंदे गट ऋतुजा लटकेंना आपल्या पक्षात आणून त्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न करत आहे.
शिंदे गट आणि भाजपा येथे एकत्र लढणार की स्वतंत्र उमेदवार देणार, हे लवकरच स्पष्ट होईल.

 

Web Title :- Andheri By-Election | double crisis facing uddhav thackeray before andheri by election cm eknath shindes try to nominate rituja latke by balasahebanchi shivsena

 

हे देखील वाचा :

India vs SA | दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सिरीज जिंकून भारताने ऑस्ट्रेलियाच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी

Kolhapur Crime | धक्कादायक! कोल्हापुरात शेती परवडत नसल्याने तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

Child Artist Rahul Koli Passed Away | 10 वर्षीय ‘या’ प्रसिद्ध बालकलाकाराचे कर्करोगाने निधन

 

Related Posts