IMPIMP

Samata Party | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या निशाणी ‘मशाल’वर समता पक्षाचा आक्षेप

by nagesh
Samata Party | Samata Party's objection to Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray group's symbol 'Mashal'

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शिवसेनेच्या अंतर्गत वादावर तोडगा काढला. अंधेरी पूर्व येथे होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी (Andheri East By-Election) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला हंगामी नावे आणि चिन्हे देण्यात आली आहेत. त्यात ठाकरे यांच्या गटाला मशाल (Mashal Symbol) हे पक्षचिन्ह मिळाले आहे. या चिन्हाचा उद्धव ठाकरे यांच्या गटाने स्वीकार करत जल्लोष साजरा केला. पण आता समता पक्षाने (Samata Party) या चिन्हावर आक्षेप घेतला आहे. 1994 पासून राष्ट्रीयकृत मशाल चिन्ह आमचे आहे, असे समता पक्षाने (Samata Party) सांगितले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जॉर्ज फर्नांडीस (George Fernandes) आणि नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी 1994 साली समता पक्षाची (Samata Party) स्थापना केली. तेव्हापासून आम्ही मशाल या चिन्हावर निवडणूक लढवित आलो आहोत. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने आमचे चिन्ह शिवसेनेच्या ठाकरे गटाला (Thackeray Group) दिले आहे. त्यामुळे आम्ही आयोगाकडे हे चिन्ह आमचे असल्याचा ई-मेल केला आहे. आयोगाने हे चिन्ह परत घेतले नाही, तर आगामी काळात न्यायालयात देखील जाण्याची आमची तयारी आहे, असे समता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर (Trunesh Devalekar) यांनी सांगितले आहे.

 

त्यामुळे शिवसेनेला हंगामी स्वरुपात मिळालेले मशाल चिन्ह थोड्याच वेळात वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
दोनही पक्षांची एकच चिन्ह असू शकत नाहीत. त्यामुळे आयोग आता कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

 

Web Title :- Samata Party | Samata Party’s objection to Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray group’s symbol ‘Mashal’

 

हे देखील वाचा :

Andheri By-Election | नवी खेळी! एकनाथ शिंदे शिवसेनेला अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वी आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत

India vs SA | दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सिरीज जिंकून भारताने ऑस्ट्रेलियाच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी

Kolhapur Crime | धक्कादायक! कोल्हापुरात शेती परवडत नसल्याने तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

 

Related Posts