IMPIMP

India vs SA | दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सिरीज जिंकून भारताने ऑस्ट्रेलियाच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी

by nagesh
India vs SA | ind vs sa 3rd odi live updates india have defeated south africa and seal the odi series by 2 1

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन भारताच्या (India) गोलंदाजांनी निर्णायक व तिसऱ्या वन डे सामन्यात (One Day Match) उत्तम कामगिरी करत आफ्रिकेच्या (South Africa) टीमवर वर्चस्व निर्माण केले. या सामन्यात नाणेफेक जिंकून कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) घेतलेला गोलंदाजीचा निर्णय मोहम्मद सिराज (Mohammad Siraj), वॉशिंग्टन सुंदर(Washington Sundar), कुलदीप यादव (Kuldeep Yadav) व शाहबाज अहमद (Shahbaz Ahmed) यांनी सार्थ ठरवला. या सामन्यात थोड्यासाठी  कुलदीपची हॅटट्रिक हुकली. या सामना भारताने 7 विकेट्स राखून सहज जिंकला. तसेच आफ्रिकेविरुद्धच्या मालिकासुद्धा 2-1 अशा फरकाने जिंकली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून धक्के देत दक्षिण आफ्रिकेवर (India vs SA) वर्चस्व  निर्माण केले. या सामन्यात क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) ( 6), यानेमन मलान (Yaneman Malan) ( 15), रीझा हेंड्रिक्स (Riza Hendrix)
(9), एडन मार्करम (Aiden Markram) ( 9), डेव्हिड मिलर (David Miller) ( 7), अँडिले फेहलुकवायो (Andile Fehlukwayo) (5) हे सगळे आघाडीचे फलंदाज एकेरी धावा करून बाद झाले.
हेनरिच क्लासेन (Heinrich Klassen) आफ्रिकेसाठी एका बाजूने खिंड लढवत होता.
त्याने 42 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीने 34 धावा केल्या. यानंतर कुलदीप यादवने त्याची विकेट घेत भारताला यश मिळवून दिले. या सामन्यात आफ्रिकेला 100 धावादेखील करता आल्या नाहीत.
त्यांचा संपूर्ण संघ 99 धावांवर बाद झाला.

 

या सामन्यात कुलदीप यादवनं 4 वॉशिंग्टन सुंदरने 2, शहाबाज अहमदने 2 आणि मोहम्मद सिराजने 2 विकेट घेत
संघाच्या विजयात मोलाची भूमिका पार पडली.
यानंतर दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन ( 8) आणि इशान किशन (Ishan Kishan) 10 धावा करून माघारी परतला.
यानंतर शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी चांगला खेळ करताना भारताचा विजय पक्का केला.
शुभमन गिलचे (Shubman Gill) 1 धावे साठी अर्ध शतक हुकलं. तो 49 धावांवर बाद झाला.

 

भारताचा 2022 कॅलेंडर वर्षातील हा 38 वा विजय ठरला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विजय मिळवण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या (Australia) ( 2003) विक्रमाशी भारताने बरोबरी केली.
या वर्षी भारताने 2 कसोटी, 13 वन डे व 23 T -20 सामने जिंकले आहेत. 2017 मध्ये भारताने 37 विजय मिळवले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- India vs SA | ind vs sa 3rd odi live updates india have defeated south africa and seal the odi series by 2 1

 

हे देखील वाचा :

Kolhapur Crime | धक्कादायक! कोल्हापुरात शेती परवडत नसल्याने तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

Child Artist Rahul Koli Passed Away | 10 वर्षीय ‘या’ प्रसिद्ध बालकलाकाराचे कर्करोगाने निधन

Pune Crime | रेल्वेत नोकरीच्या बहाण्याने INS शिवाजीतील कर्मचार्‍याने महिलेला घातला 6 लाखांना गंडा

 

Related Posts