IMPIMP

Pune Crime Court News | मुंढवा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्हयात मुख्य आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रूपये दंड

by nagesh
Pune Crime Court News | 10 years rigorous imprisonment and a fine of Rs. 10000 in rape case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime Court News | मुंढवा पोलिस ठाण्यात (Mundhwa Police Station) सन 2016 मध्ये दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्हयात मुख्य आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावास आणि 10 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा आदेश शिवाजीनगर न्यायालयातील (Pune Shivaji Nagar Court) अतिरिक्त सत्र न्यायाधिश व्ही.ए. पत्रावळे (Sessions Judge V.A. Patravale)यांनी दिला आहे. (Pune Crime Court News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

अभिनय संतोषकुमार साही (Abhina Santhoshkumar Sahi) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 28 फेब्रुवारी 2016 रोजी मुंढवा पोलिस ठाण्यात भादंवि 328, 366, 376 (डी), 342, 114, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. एकुण 6 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्हयाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक व सध्या पोलिस निरीक्षक असलेले एस.एस. घार्गे, त्यांचे दप्तरी पोलिस अंमलदार राजेंद्र जगताप (सध्या – सेवानिवृत्त), पोलिस अंमलदार राहुल मुळे (सध्या नेमणुक – पोलिस मुख्यालय, पुणे शहर) यांनी मिळुन तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक जानमोहम्मद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली केला. गुन्हयातील आरोपीविरूध्द सबळ व भरपुर पुरावा उपलब्ध करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. (Pune Crime Court News)

शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयात सदरची केस बोर्डावर घेवुन सनावणी सुरू करून फिर्यादी,
साक्षीदार, पंच, डॉक्टर, जप्त पुरावा,
तज्ञ साक्षीदार यांची जबानी नोंद करून गुन्ह्यातील कागदोपत्री पुराव्याची खातरजमा करण्यात आली. शेवटी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.ए. पत्रावळे यांनी मुख्य आरोपी अभिनय संतोषकुमार साही यास फौजदारी संहिता कलम 235 (5) प्रमाणे दोषी ठरवून भादंवि कलम 376 (2) (जे) मध्ये 10 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रूपये दंड ठोठावला.

न्यायालयातील सुनावणी दरम्यान पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh),
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हाणे (Sr PI Vishnu Tamhane) यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी पोलिस उपनिरीक्षक गणेश कुलाळ, सरकारी अभियोक्ता रमेश घोरपडे, पोलिस अंमलदार आनंद यादव, गंगाधर छत्तीसे यांनी दाखल गुन्हयात न्यायालयाने वेळावेळी दिलेल्या आदेशाची पुर्तता केली आहे.

Web Title : Pune Crime Court News | 10 years rigorous imprisonment and a fine of Rs. 10000 in rape case

Related Posts