IMPIMP

Maharashtra Political Crisis | शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता भाजपमध्ये होणार मोठा भूकंप, पंकजा मुंडे काँग्रेसच्या वाटेवर?

सोनिया गांधी, राहुल गांधीची भेट घेतल्याची वरिष्ठ नेत्याची माहिती

by nagesh
Maharashtra Political Crisis | shivsena became ncp now there will be a big earthquake in bjp big leaders on the way to congress

मुंबई : रकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Political Crisis | राज्यात एक वर्षापूर्वी शिवसेनेत (Shivsena) फूट पडली होती. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून वेगळी वाट धरली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षात बंडखोरी केली. अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आठ आमदारांनी सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता भाजपमध्ये (BJP) मोठा राजकीय भूकंप (Maharashtra Political Crisis) होण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.

 

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली असल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. पंकजा मुंडे यांनी दोन वेळा दिल्लीत जाऊन भेट घेतली असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांसोबत पक्ष प्रवेशाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सांगलीतील बड्या नेत्याकडून पंकजा मुंडे यांच्यासाठी लॉबिंग सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यासंदर्भात एका वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. (Maharashtra Political Crisis)

अजित पवार यांनी बंड केल्यामुळे त्यांच्यासोबत अनेक आमदार गेले आहेत. यामध्ये धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचाही समावेश आहे. धनंजय मुंडे भाजपला पाठिंबा देत थेट मंत्री झाल्याने पंकजा मुंडे यांना परळीमध्येच आव्हान निर्माण झालं आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता भाजपसोबत आल्याने परळीतून पुढील निवडणूक तेच लढवतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना आपल्या पारंपरिक मतदारसंघावर पाणी सोडावे लागू शकते. त्यामुळेच पंकजा मुंडे यांनी पुढील वाटचालीबाबत चाचपणी करण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे.

दरम्यान, पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)
यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना पटोले यांनी सूचक विधान केलं आहे. पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये येणार असतील तर स्वागत आहे. त्यांनी सोनिया गांधींची भेट घेतली असेल तर ती चांगली बाब आहे, असं नाना पटोले म्हणाले.

सध्या पंकजा मुंडे आहेत कुठे?

गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे.
याच दरम्यान त्या काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
राज्यात त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले असताना मागील चार दिवसांपासून त्या राज्याच्या बाहेर आहेत.
4 जुलै पासून पंकजा मुंडे मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) दौऱ्यावर आहेत.
उजैन्नमध्ये भाजपकडून आयोजित प्रदेश कोर कमिटीच्या बैठकीला (Pradesh Core Committee Meeting) त्या हजर होत्या.

Web Title : Maharashtra Political Crisis | shivsena became ncp now there will be a big earthquake in
bjp big leaders on the way to congress

Related Posts