IMPIMP

Pune Crime | शेअरमध्ये गुंतवणुकीतून जादा परताव्याच्या आमिषाने 10 लाखांची फसवणूक

by nagesh
Pune Crime | FIR Against Zen Money Plant Directors In Koregaon Park Police Station Pune For Cheating Investors Of Rs 11 Crore

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | शेअर ट्रेडिंगचे प्रशिक्षण (Stock Trading Training) देऊन शेअर बाजारात गुंतवणुक (Share Market Investment) केल्यास जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष (Pune Crime) दाखवून तरुणाची १० लाख रुपयांची फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकणी खेड तालुक्यातील (Khed Taluka) एका ३३ वर्षाच्या तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ऋषीकेश आप्पा भोसले Rishikesh Appa Bhosle (वय ३३, रा. हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल (FIR) केला आहे. हा प्रकार २६ फेब्रुवारी २०२० पासून आजपर्यंत घडला (Pune Crime) आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषीकेश भोसले हा सातारा (Satara) येथील गुडविल वेल्थ मॅनेजमेंट (Goodwill Wealth Management) या कंपनीचा सबब्रोकर (Sub-broker) आहे. त्याने हडपसर (Hadapsar) येथे कार्यालय सुरु केले आहे. तेथे त्याने फिर्यादी यांना शेअर ट्रेडिंगचे प्रशिक्षण दिले. शेअर बाजारात (Stock Market) रक्कम गुंतवणुक केली तर तुम्हाला मोठा परतावा देतो, असे आश्वासन दिले. त्यांचे डिमेंट अकाऊंट (Demat Account) उघडून दिले.

शेअर मार्केटमध्ये पोर्टफोलिओ मॅनेजमेंट (Portfolio Management) अकाऊंटवर ९ लाख ९६ हजार ९८५ रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले.
आपल्या आर्थिक फायदा करण्यासाठी व गैरउद्देशाने त्यांचा विश्वास संपादन करुन आधारकार्ड, फोटो, पॅनकार्ड,
बँक चेक, ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट, फोन नंबर, ई मेल आयडी, सहीचा फोटो हे कागदपत्रे घेतली.
त्यांच्याकडून ९ लाख ९६ हजार ९८५ रुपये घेऊन विश्वास संपादन करण्यासाठी नाममात्र रक्कम परतावा म्हणून देऊन त्यांची ९ लाख ९६ हजार ९८५ रुपयांची फसवणूक केली आहे.

Web Title :- Pune Crime | Fraud of Rs 10 lakh for lure of extra return on investment in shares

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Shivaji Adhalarao Patil | आढळरावांचं खा. अमोल कोल्हेंना आव्हान; म्हणाले – ‘बैलगाडा शर्यतीच्या पहिल्या बारीत घोडीवर बसण्याचा शब्द पाळा’

Kirit Somaiya | पुण्यातील कोविड सेंटरचं कंत्राट चहावाल्याला ! किरीट सोमय्या थेट मुंबईच्या चहावाल्याच्या दुकानात; उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…

Pune Crime | पुण्यात जन्मदात्या बापानेच केला आपल्या 16 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेच्या नजरेमुळे आला प्रकार उघडकीस

Related Posts