IMPIMP

Pune Crime | पुण्यात जन्मदात्या बापानेच केला आपल्या 16 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेच्या नजरेमुळे आला प्रकार उघडकीस

by nagesh
Pune Crime | Shocking ! Young boy stabbed 10th std young girl in school Farewell Ceremony vadgaon sheri of pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | नेहमी अभ्यास करणारी मुलगी आता अभ्यास करत नाही. वर्गात कोणाशी बोलत नाही, वर्गात एकदम शांत रहात असल्याचे तिच्या शिक्षिकेला जाणवले. त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यातून जन्मदाता पिताच तिच्यावर गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार (Rape In Pune) करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. (Pune Crime)

याप्रकरणी मुख्याध्यापिकांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Raod Police) फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी ४५ वर्षाच्या बापाला अटक केली आहे. हा प्रकार २०१९ ते ८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान वारंवार घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित १६ वर्षाची मुलगी धायरीतील (Dhayari) एका शाळेत इयत्ता १० वीच्या वर्गात शिकत आहे. ही मुलगी राहते घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन तिचे ओठांची पप्पी घेऊन तिच्या वडिलांनी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. त्याला विरोध केल्यावर तिला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिला हाताने मारहाण करुन उजवे हाताला दुखापत केली आहे. (Pune Crime)

मुख्याध्यापिका यांना ही बाब समजताच त्यांनी तातडीने सिंहगड रोड पोलीस ठाण्याशी संपर्क साधून फिर्याद दिली.
पोलिसांनी बापाला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक खेडकर (PSI Khedekar) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Pune born father sexually abuses his 16 year old daughter; The teacher’s gaze revealed the type

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

BP Control | हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी नाश्त्यात करावे ‘या’ 5 गोष्टींचे सेवन, पूर्ण दिवस राहिल बीपी कंट्रोल

Pune Crime | पुण्यात 16 वर्षाच्या मुलीचे नग्न अवस्थेतील फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी; लोणीकंद पोलिसांकडून तरूणाला अटक

Dr. Suvarna Vaje Murder Case | डॉ सुवर्णा वाजे यांचे मोबाईल चॅट डिलीट; पतीने असं का केलं? धक्कादायक खुलासा समोर

Related Posts