IMPIMP

Pune Crime | अपहरण झालेल्या 5 वर्षाच्या मुलाची 3 तासात सुखरुप सुटका, आरोपी बिबवेवाडी पोलिसांच्या ताब्यात

by nagesh
Pune Crime | Kidnapping in Pune Abducted 5 year old boy rescued in 3 hours accused in Bibvewadi police custody

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | घरासमोर खेळत असलेल्या पाच वर्षाच्या मुलाचे अपहरण (Kidnapping in Pune) झाल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या (Bibvewadi Police Station) हद्दीत घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अपहरण झालेल्या मुलाची अवघ्या तीन तासात सुखरुप सुटका करुन आरोपीला (Accused) ताब्यात घेतले. पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने तपास करुन अपहरण झालेल्या मुलाची सुटका करुन त्याच्या आईच्या ताब्यात दिले. ही घटना 2 जानेवारी रोजी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास अप्पर इंदिरानगर (Upper Indira Nagar) येथे घडली होती.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत ज्योती धनराज साळुंखे Jyoti Dhanraj Salunkhe (रा. पवननगर, शनिमंदिरा जवळ, बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी स्वप्नील रमेश शिंदे (Swapnil Ramesh Shinde) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महिला यांचा मुलगा निरज (Niraj) हा सायंकाळी घरासमोर खेळत असताना आरोपी स्वप्नील शिंदे याने जीवे मारण्याच्या उद्देशाने दुचाकीवरुन पळवून नेले. (Pune Crime)

 

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासले. तसेच चार पथके तयार करुन बिबवेवाडी, मार्केटयार्ड (Marketyard) व स्वारगेट (Swargate) परिसरात मुलाचा शोध सुरु केला. दरम्यान पोलिसांनी आरोपी स्वप्नील शिंदे याच्या घरच्यांकडे आणि मित्रांकडे त्याची चौकशी करुन तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरु केला.

 

मुलाचा शोध घेत असताना काकडे वस्ती येथे अंधारात पार्क केलेली वाहने पोलीस तपासत होते. त्यावेळी पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, पोलीस नाईक देवकते, पोलीस हवालदार देशमाने यांना एका रिक्षामध्ये आरोपी हा एका लहान मुलासह बसलेला आढळून आला. पोलिसांनी आरोपी आणि अपहरण झालेल्या मुलाला ताब्यात घेतले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आरोपीकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने मुलाच्या आईसोबत झालेल्या भांडणाच्या (Dispute) रागातून मुलाचे अपहरण केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
मुलाची आई एका मॉलमध्ये काम करत असून ती एकटीच या मुलाचा सांभाळ करते.
आरोपी याने दुपारपासून पाळत ठेवून मुलाला घरासमोर खळेत असताना त्याला चॉकलेट देऊन दुचाकीवरुन पळवून नेले होते.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan), पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे (Senior Police Inspector Sunil Jhaware),
पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर (Police Inspector Anita Hivarkar),
तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे (API Pravin Kalukhe) व तपास पथकाने केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Kidnapping in Pune Abducted 5 year old boy rescued in 3 hours accused in Bibvewadi police custody

 

हे देखील वाचा :

Baba Bhide Bridge | मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्प ! पुण्यातील बाबा भिडे पूल होणार इतिहासजमा

Radhika Madan | प्रसिध्द अभिनेत्रीनं केला मोठा खुलासा; म्हणाली – ‘मला शूटिंगच्या पहिल्याच दिवशी गर्भनिरोधक गोळी…’

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची सुपरहिट स्कीम ! झीरो रिस्कवर मिळवा 16 लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर

Mula Mutha Riverfront Development Project | मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजना ! पहिल्या 2 टप्प्यांच्या निविदा आठवड्याभरात उघडणार; बाबा भिडे पूल काढणार, नदी पात्रातील रस्ता बंद होणार, गरवारे कॉलेज मागे पाणी अडवण्यासाठी ब्यारेज बांधणार

 

Related Posts