IMPIMP

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची सुपरहिट स्कीम ! झीरो रिस्कवर मिळवा 16 लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Post Office MIS | post office monthly income scheme husband and wife can open an account together

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Post Office Scheme | प्रत्येकाला असे वाटते की आपली गुंतवणूक सुरक्षित (Safe Investment Options) असावी. तसेच, कमी जोखमीसह चांगला परतावा मिळवा. इक्विटी मार्केटमध्ये (Equity Market) जोखीम जास्त असल्याने परतावा देखील इतर इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्टपेक्षा जास्त असतो. पण प्रत्येकामध्ये जोखीम घेण्याची क्षमता नसते. अशा स्थितीत, जर तुम्हाला अशी गुंतवणूक हवी असेल जिथे नफा (Profit on Investment) सुद्धा असेल आणि जोखीम नसेल, तर पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी चांगले आहे. (Post Office Scheme)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना धोका पत्करायचा नाही तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतात. आम्ही तुम्हाला एक अशी गुंतवणूक योजना सांगत आहोत जिथे जोखीम नगण्य असते आणि परतावाही चांगला मिळतो. पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (Post Office Recurring Deposit) हा त्यापैकी एक गुंतवणुकीचा मार्ग आहे.

 

कशी करावी पोस्ट ऑफिस RD मध्ये गुंतवणूक
पोस्ट ऑफिस आरडी डिपॉझिट खाते ही चांगल्या व्याजदरासह लहान हप्ते जमा करण्यासाठी एक सरकारी हमी योजना आहे, यामध्ये तुम्ही फक्त 100 रुपयांच्या छोट्या रकमेसह गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही, तुम्ही त्यात हवे तेवढे पैसे टाकू शकता.

 

या योजनेचे खाते पाच वर्षांसाठी उघडले जाते. मात्र, बँका सहा महिने, 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षांसाठी आवर्ती ठेव खात्यांची सुविधा देतात. त्यात जमा केलेल्या पैशावर प्रत्येक तिमाहीत (वार्षिक दराने) व्याज मोजले जाते आणि प्रत्येक तिमाहीच्या शेवटी ते तुमच्या खात्यात (चक्रवाढ व्याजासह) जोडले जाते. (Post Office Scheme)

किती मिळेल व्याज ते जाणून घ्या
सध्या, आवर्ती ठेव योजनेवर 5.8% व्याज उपलब्ध आहे, हा नवीन दर 1 एप्रिल 2020 पासून लागू आहे. भारत सरकार प्रत्येक तिमाहीत आपल्या सर्व लहान बचत योजनांचे व्याजदर निश्चित करते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

10 हजार दरमहिना टाकले तर मिळतील 16 लाख
जर तुम्ही पोस्ट ऑफिस आरडी स्कीममध्ये 10 वर्षांसाठी दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 10 वर्षांनंतर तुम्हाला 5.8% दराने 16 लाखांपेक्षा जास्त रुपये मिळतील.

मासिक गुंतवणूक – 10,000 रु

व्याज – 5.8%

परिपक्वता – 10 वर्षे

10 वर्षानंतरची मॅच्युरिटी रक्कम = रु. 16,28,963

 

आरडी खात्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी
तुम्हाला खात्यात नियमित पैसे जमा करत राहावे लागेल, जर तुम्ही पैसे जमा केले नाहीत तर तुम्हाला दरमहा एक टक्क दंड भरावा लागेल. 4 हप्ते चुकल्यानंतर तुमचे खाते बंद केले जाते.

 

पोस्ट ऑफिस RD वर कर
आवर्ती ठेवींमधील गुंतवणुकीवर टीडीएस कापला जातो, जर ठेव रु. 40,000 पेक्षा जास्त असेल तर वार्षिक 10% दराने कर आकारला जातो. आरडीवर मिळालेले व्याज देखील करपात्र आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

परंतु संपूर्ण मॅच्युरिटी रकमेवर कर आकारला जात नाही. ज्या गुंतवणूकदारांकडे कोणतेही करपात्र उत्पन्न नाही ते FD प्रमाणेच फॉर्म 15G भरून TDS सूटचा दावा करू शकता.

पोस्ट ऑफिस व्यतिरिक्त, सरकारी आणि खाजगी बँका देखील आवर्ती ठेवीची सुविधा प्रदान करतात.

बँकांच्या आवर्ती ठेवी (Bank RD Account)

बँक –                        आरडी दर –                       कालावधी

Yes Bank –             7.00% –                12 महिने ते 33 महिने

HDFC Bank –        5.50% –                90/120 महिने

Axis Bank –            5.50% –                5 वर्षे ते 10 वर्षे

SBI Bank –             5.40% –                5 वर्षे ते 10 वर्षे

 

Web Title :- Post Office Scheme | post office scheme invest 10k monthly in the post office rd scheme and get 16 lakh rupees see details

 

हे देखील वाचा :

Mula Mutha Riverfront Development Project | मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजना ! पहिल्या 2 टप्प्यांच्या निविदा आठवड्याभरात उघडणार; बाबा भिडे पूल काढणार, नदी पात्रातील रस्ता बंद होणार, गरवारे कॉलेज मागे पाणी अडवण्यासाठी ब्यारेज बांधणार

Shilpa Shetty-Raj Kundra | काय सांगता ! होय, राज कुंद्राने शिल्पा शेट्टीच्या नावे केले 5 फ्लॅट; जाणून घ्या किंमत

API To PI Promotions And Transfers | पिंपरी-चिंचवड शहरातील 11 सहायक पोलीस निरीक्षकांची पदन्नोतीने बदली

 

Related Posts