IMPIMP

Pune Crime | माथाडी कामगाराला खंडणीसाठी मारहाण, प्रत्येक गाडीमागे 15 हजार रुपयाची मागणी; तिघांवर FIR

by nagesh
Pune Crime | FIR against husband and daughter's father in child marriage case

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | माथाडी कामगाराला (Mathadi Worker) मारहाण (Beaten) करुन खंडणी (Ransom) मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार देहूरोड पोलीस ठाण्याच्या (Dehuroad Police Station) हद्दीतील मामुर्डी येथील गोदरेज प्रॉपर्टीजच्या (Godrej Properties Mamurdi) साईटवर शुक्रवारी (दि.28) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला (Pune Crime) आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

बाबा चव्हाण (Baba Chavan), सोमनाथ गडदे (Somnath Gadde), नविन (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी समित अरुण राऊत Samit Arun Raut (वय-29 रा. मामुर्डी ता. हवेली) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे माथाडी कामगार आहेत. फिर्यादी हे भैरवनाथ महाराज व्यावसायिक माथाडी संघटनेला (Bhairavnath Maharaj Mathadi Sansthan) मिळालेल्या करारनुसार ट्रक (एमएच 46 एफ 6042) घेऊन साईटवर स्टाईल खाली करण्यासाठी जात होते. त्यावेळी आरोपी बाबा चव्हाण आणि त्याच्या साथिदारांनी गाडी आडवून फिर्यादी यांना शिवीगाळ करुन दमदाटी केली. तसेच ट्रकवरील चालक व कामगार यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

 

आरोपी बाबा चव्हाण याने कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी (Threat) देऊन 15 हजार रुपये खंडणीची मागणी केली.
पैसे दिले तरच गाडी सोडू असे म्हणत कंपनीत येणाऱ्या प्रत्येक गाडीमागे 15 हजार रुपये द्यायचे.
अन्यथा गाडी खाली करुन देणार नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास देहुरोड पोलीस करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Mathadi worker beaten for ransom demanded Rs 15,000 for each vehicle FIR on three

 

हे देखील वाचा :

Rajesh Tope | ‘तिसऱ्या लाटेचा उच्चांक येऊन गेला’ ! राजेश टोपे म्हणाले – ‘नवीन व्हेरियंट अजून…’

Diabetic Patients Diet | बडीशेप मधुमेहच्या पेशंटसाठी अत्यंत लाभदायक, अशाप्रकारे सेवन केल्याने कंट्रोलमध्ये राहील Blood Sugar Level

IAS Sushil Khodvekar | TET Exam Scam प्रकरणात अटक करण्यात आलेले IAS सुशिल खोडवेकर कोण आहेत? जाणून घ्या आतापर्यंतच्या त्यांच्या पोस्टींग

 

Related Posts