IMPIMP

Pune Crime | कोथरुड परिसरातील टोळीवर मोक्का; पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांकडून आतापर्यंत 104 टोळ्यांविरुद्ध मोक्का

by nagesh
Pune Crime | MCOCA on the Asif Khan gang of Kondhawa; Pune Police Commissioner Amitabh Gupta's 114th MCOCA action to date

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | शहरातील कोथरुडमधील केळेवाडी परिसरात दहशत माजविणारा गुंड सागर येनपूरे (Gangster Sagar Yenpure) आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (MCOCA) Mokka कारवाई केली आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सागर उर्फ मांडी तानाजी येनपूरे (Sagar Yenpure Gang), साहिल विनायक जगताप, अक्षय दामू वाळुंज, सुरेश कालीदास वाजे, वैभव उर्फ भोऱ्या प्रदीप जगताप (सर्व रा. केळेवाडी, पौड रस्ता, कोथरुड) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत. येनपूरे, त्याचे साथीदार, जगताप, वाळुंज, वाजे यांनी पौड रस्त्यावरील केळेवाडी (Paud Phata, Kelewadi, Kothrud, Pune, Maharashtra) परिसरात दहशत माजविली होती. त्यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दहशत माजविणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. (Pune Crime)

 

येनपूरे टोळीच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर आरोपींच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याने कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप (Senior Police Inspector Mahendra Jagtap),
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे (Police Inspector Balasaheb Bade),
उपनिरीक्षक तानाजी पांढरे (PSI Tanaji Pandhre), प्रवीण कुलकर्णी, अजय सावंत यांनी मोक्का कारवाई
करण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला. संबंधित प्रस्ताव अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे
(Addl CP Rajendra Dahale), उपायुक्त पौर्णिमा गायकवाड (DCP Purnima Gaikwad)
यांच्याकडे पाठविण्यात आला. प्रस्तावाची पडताळणी करुन पोलीस आयुुक्तांनी येनपूरे टोळीच्या विरोधात
मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले. गेल्या दीड वर्षात शहर परिसरातील १०४ गुंड टोळ्यांच्या विरोधात पोलीस आयुक्तांच्या आदेशाने मोक्का कारवाई केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | MCOCA (Mokka) on a sagar yenpure gang in the Kothrud area

 

हे देखील वाचा :

Raj Thackeray | मनसे-भाजपा-शिंदे गटाच्या संभाव्य युतीवर राज ठाकरे यांनीच दिले स्पष्टीकरण, म्हणाले…

Kishori Pednekar | किशोरी पेडणेकरांच्या सासूचे निधन; किरीट सोमय्यांवर केला गंभीर आरोप

Ashish Shelar | राज ठाकरे यांच्या पंतप्रधानांवरील टीकेला आशिष शेलारांचे प्रत्युत्तर

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘माझ्या एका फोनवर बच्चू कडू …’

 

Related Posts