IMPIMP

Ashish Shelar | राज ठाकरे यांच्या पंतप्रधानांवरील टीकेला आशिष शेलारांचे प्रत्युत्तर

by nagesh
Ashish Shelar | bjp ashish shelar answer mns raj thackeray over his criticism on pm narendra modi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन Ashish Shelar | सुरुवातीला महाराष्ट्रास पसंती दिलेले चार प्रकल्प ऐनवेळी गुजरातला गेल्याने सत्ताधाऱ्यांना विरोधकांचा रोष सहन करावा लागत आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधानांवर टीका करत त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन दिली होती. त्यावर आमदार आणि मुंबईचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राज ठाकरेंना उत्त्तर दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सगळ्या राज्यांना समान न्याय देतात. ते कोणत्याही राज्यासोबत दुजाभाव करत नाहीत. धारावीचा विकास करण्याच्या घोषणा अनेकांनी केल्या. पण कोणीही ठोस पावले उचलली नाहीत. त्यासाठी रेल्वेची जागा आम्ही दिली. एअर इंडियाची इमारत महाराष्ट्राच्या बाहेर जाईल, अशी परिस्थिती होती. पण ती इमारत महाराष्ट्र सरकारला मिळाली. यासाठी भाजपने (BJP) आणि केंद्र सरकारने (Central Government) प्रयत्न केले. महाराष्ट्रातील विकास कामांची प्रगती, त्याला लागणारा निधी, त्यासाठीच्या परवानग्या आदी सर्व गोष्टी पंतप्रधान कार्यालयातून होतात, असे म्हणत राज ठाकरे यांच्या टीकेला शेलारांनी उत्तर दिले.

 

तसेच राज ठाकरे यांना मी परिपक्व राजकारणी समजतो. पण छोट्याश्या पुराव्यावरुन त्यांनी भाष्य करणे, हे परिपक्वपणाचे लक्षण नाही. गेल्या चार महिन्यात राज्यात आलेल्या अनेक प्रकल्पांची मी त्यांना माहिती देईन. नुकतीच रांजनगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची घोषणा झाली आहे. त्याचे राज ठाकरे यांनी स्वागत करायला हवे होते.

 

एकामागे एक असे चार प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याने राज ठाकरे यांनी पंतप्रधनांवर टीका केली होती.
ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात येणार प्रत्येक मोठा प्रकल्प गुजरातला जातोय, हे वाईट आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी यावर विचार करायला हवा.
पंतप्रधान हे देशाचे हवेत, राज्याचे नकोत. देशातील प्रत्येक राज्याकडे त्यांनी समान दृष्टीने पहायला हवे.
महाराष्ट्रातील प्रकल्प आसाम किंवा अन्य कोणत्या राज्यात गेले असेत, तर वाईट वाटले नसते.
पण वाईट याचे वाटत आहे की, जो प्रकल्प येतोय, तो गुजरातला जातोय. पंतप्रधानांनी यात लक्ष घातले पाहिजे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ashish Shelar | bjp ashish shelar answer mns raj thackeray over his criticism on pm narendra modi

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘माझ्या एका फोनवर बच्चू कडू …’

Pune Crime | वास्तूशास्त्र सल्लागाराचे अपहरण करुन केला खून, मृतदेह नीरा नदीत फेकला; मित्रासह साथीदाराला अटक

T20 World Cup 2022 | सूर्यकुमारने गंभीर-युवराजच्या यादीत मिळवले स्थान; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला 6 वा भारतीय

Bacchu Kadu Reaction On Ravi Rana | मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करूनही बच्चू कडू – रवी राणांमधील वाद मिटला नाही?

 

Related Posts