IMPIMP

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘माझ्या एका फोनवर बच्चू कडू …’

by nagesh
Bachchu Kadu | mla bachchu kadu to meet deputy cm devendra fadanvis today commented on conflicts with ravi rana

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यात सुरु असलेल्या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मध्यम मार्ग काढला आहे. रवी राणा यांनी बच्चू कडू यांची माफी मागितली आहे. तसेच आता देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मोठा गौप्यस्फोट देखील केला आहे. माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले होते, असे फडणवीस म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मी कडू यांना फोन केला आणि सांगितले की, आम्हाला सरकार स्थापन करायचे आहे. तुम्ही आमच्यासोबत या, आणि ते गुवाहाटीला गेले. आता त्यांनी कोणासोबत सौदा केला, काय केले, असे आरोप करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांच्यावर केलेले आरोप योग्य नव्हते. बाकीच्या आमदारांसोबत काय झाले, हे मला माहीत नाही. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण गेले होते. मी रवी राणा यांची समजूत काढली आहे. त्यांनी त्यांची चूक मान्य केली आहे. दोघेही रागाच्या भरात एकमेकावर आरोप करत होते. आता दोघांनाही विकास कामांवर लक्ष दिले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

 

रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले होते. कडू गुवाहाटीला गेलेल्या आमदारांपैकी आहेत. त्यामुळे त्यांनी 50 कोटी घेतले होते, असे राणा म्हणाले होते. त्यावर कडू यांनी संताप व्यक्त केला होता. राणा यांच्या आरोपात काही तथ्य नाही. त्यांनी केवळ आरोप करु नये, पुरावे द्यावेत. त्यांनी पुरावे न दिल्यास आम्ही 8 ते 10 आमदार वेगळी भूमिका घेऊ असे त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले होते. राणा यांनी केलेल्या आरोपामुळे केवळ मीच नाही तर अन्य आमदार देखील संकटात आले आहेत. राणांच्या आरोपात गुवाहाटीला बंडात सामील असलेल्या सर्व आमदार आणि मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांकडे जनता वेगळ्या नजरेने पाहू लागली आहे, असे कडू म्हणाले होते.

 

त्यांच्या या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांची भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी त्यांनी कडू आणि राणा दोघांची देखील समजूत काढली. सरकारला अडचण निर्माण होईल,
किंवा सरकारा अडचणीत येईल, असे कोणतेही काम दोघांनी करु नये, असे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दोघांना दिले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Devendra Fadnavis | bachu kadu went to guwahati on one of my phone call says devendra fadnavis

 

हे देखील वाचा :

Pune Crime | वास्तूशास्त्र सल्लागाराचे अपहरण करुन केला खून, मृतदेह नीरा नदीत फेकला; मित्रासह साथीदाराला अटक

T20 World Cup 2022 | सूर्यकुमारने गंभीर-युवराजच्या यादीत मिळवले स्थान; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला 6 वा भारतीय

Bacchu Kadu Reaction On Ravi Rana | मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करूनही बच्चू कडू – रवी राणांमधील वाद मिटला नाही?

Raj Thackeray | पंतप्रधान देशाचे हवेत, राज्याचे नकोत – राज ठाकरे

 

Related Posts