IMPIMP

Pune Crime | जमिनीच्या वादातून चुलत भावाने बहीणवर तब्बल 35 वार करुन केला खून

by nagesh
Pune Pimpri Crime | waiter was killed after getting rice in the mutton soup pimple saudagar sangvi police murder pune pimpri chinchwad crime news

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | आंदरमावळ (Andarmaval) भागातील माळेगाव बु. गावच्या हद्दीतील तळपेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी एका आदिवासी महिलेचा (Tribal Woman) खून (Murder In Pune) झाला होता. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करुन दोन दिवसांत गुन्हेगाराच्या मुसक्या (Arrest) आवळल्या आहेत. या महिलेचा खून (Pune Crime) तिच्या चुलत भावानाचे (Cousin) केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हा खून जमिनीच्या वादातून (Land Dispute) झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

वसंत रघु माळी Vasant Raghu Mali (वय – 28) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, आरोपी हा मृत महिलेचा चुलत भाऊ आहे. रविवारी (दि.13) दुपारी तळपेवाडी (Talpewadi) येथे आरोपी वसंत माळी याने त्याची चुलत बहीण फसाबाई साळू निसाळ (Fasabai Salu Nisal) यांचा कोयत्याने तोंडावर, मानेवर, हातावर तब्बल 35 वार करुन निर्घृण खून केला होता.(Pune Crime)

 

निर्वस्त्र आढळला मृतदेह
अपर पोलीस आधीक्षक मितेश घट्टे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचा मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. घटनास्थळी कोणताही पुरावा मिळाला नसल्याने गुन्हेगाराचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख (SP Abhinav Deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा (Crime Branch) व वडगाव पोलीस (Wadgaon Police) अशी दोन पथके तैनात करण्यात आली होती.

 

महिलेसोबत कोणताही अनुचित प्रकार नाही
मृत महिलेचा कोणासोबत वाद होता का ? याबाबत माहिती घेतली असता चुलत भावासोबत जमिनीवरुन वाद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच आरोपी माळी याच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यानुसार आरोपी माळीला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने जमिनीच्या वादातून खून केल्याची कबुली दिली. निर्वस्त्र मृतदेह आढळून आला असला तरी महिलेसोबत कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे मितेश घट्टे यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गुन्हा केल्यानंतर आरोपी खुलेआम फिरत होता
आरोपी माळी याने चुलत बहिणीचा खून करुन तेथील प्लास्टिकच्या ड्रममध्ये पाण्याने हात धुतले आणि अडीच किमी अंतरावर जंगलात निघून गेला. याठिकाणी त्याने अंगावरील रक्ताने माखलेला शर्ट ओढ्याच्या पाण्यात धुवून गुन्ह्यात वापरलेला कोयता ओढ्याजवळ दगडामध्ये लपवून ठेवला. त्यानंतर तो घरी निघून गेला. गुन्हा करुन पुरावे नष्ट करुन आरोपी माळी गावामध्ये खुलेआम फिरत होता.

 

पति – पत्नीला संपवण्याचा कट होता
आरोपी आणि मयत महिला यांच्यामध्ये 9 एकर सामाईक जमीन असून या जमिनीवरुन त्यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादातून त्याने पती – पत्नीला संपवण्याचा कट होता. त्यानुसार तो गोठ्यावर पाळत ठेवून होता. मात्र, त्याठिकाणी गुरांना पाणी पाजण्यासाठी केवळ मृत महिलाच आली आणि त्याने तिच्यावर कोयत्याने वार करुन खून केला. मृत महिलेचा पती शेतात काम करत बसल्याने ते वाचले.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख (SP Dr. Abhinav Deshmukh),
अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (Addl SP Mitesh Ghatte),
पोलीस निरीक्षक अशोक शेळके (Police Inspector Ashok Shelke),
विलास भोसले (Police Inspector Vilas Bhosale)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय वडोदे (PSI Vijay Vadode),
संतोष चामे, रामेश्वर धोंगडे, अमोल गोरे, प्रकाश वाघमारे, प्रमोद नवले, सुनील जावळे, श्रीशैल कंटोळी, सचिन काळे,
अमोल कसबेकर, मनोज कदम, संजय सुपे, अमोल तावरे, शशिकांत खोपडे, भाऊसाहेब खाडे, संतोष वाडेकर,
प्राण येवले, होमगार्ड सुरेश शिंदे, नवनाथ चिमटे यांच्या पथकाने केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | murder of cousin over land dispute Wadgaon Police Pune Rural Police

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | आज पुन्हा सोने-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचा दर

Side Effects Of Drinking Excess Water | तुम्ही एका दिवसात 3 लीटरपेक्षा जास्त पाणी पिता का, तर जाणून घ्या शरीरावर होणारे याचे गंभीर परिणाम

Nashik Police | पोलीस चौकीतच रंगली होती ओली पार्टी ! नागरिकाला झिंगलेल्या पोलिसांनी केली मारहाण; प्रचंड खळबळ

 

Related Posts