IMPIMP

Pune Crime News | बँकॉक-थायलंड ट्रीपच्या बहाण्याने 13 लाखांची फसवणूक, पुण्यातील प्रकार

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीने (Star Health Insurance Company) त्यांच्या एजंटसाठी बँकॉक (Bangkok), थायलंड येथे टूर (Thailand Tour) आयोजित केली होती. टूरची विमानाची तिकिटे आणि व्हीजा यासाठी घेतलेल्या रक्कमेमधून 13 लाख 36 हजार 660 रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) केली. याप्रकरणी एस डी हॉलीडेज (SD Holidays) कंपनीच्या दर्शन ध्रुव याच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 14 नोव्हेंबर ते आजपर्यंत घडला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याप्रकरणी कपिल कमल बजाज Kapil Kamal Bajaj (वय-41 रा. विशालनगर, पिंपळे निलख) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दर्शन ध्रुव याच्यावर आयपीसी 406, 420, 467, 468, 471 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कपिल बजाज हे स्टार हेल्थ इन्शूरन्स कंपनीत वरिष्ठ झोनल ऑफिसर (Senior Zonal Officer) म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीमार्फत एजटं लोकांसाठी डिसेंबर 2022 मध्ये बँकॉक, थायलंड येथे टूर आयोजित केली होती. यासाठी सर्वांची विमानाची तिकिटे आणि व्हिजा याची पूर्तता करण्याचे काम एस.डी. हॉलिडेजला दिले होते.

एस डी हॉलीडेज कंपनीचे दर्शन ध्रुव याने ऍडव्हान्स म्हणून 8 लाख 75 हजार 160 रुपये फिर्यादी यांच्या कंपनीकडून घेतली.
त्यानंतर कंपनीच्या एजंट आणि त्यांच्या नातेवाईकांना परस्पर संपर्क साधून त्यांनाही टूर वर घेऊन जातो असे
सांगून त्यांच्याकडून 4 लाख 61 हजार 500 रुपये घेतले. मात्र, या सर्वांना कोणतेही तिकीट दिले नाही.
दर्शन ध्रुव याने कंपनी, एजंट आणि त्यांच्या नातेवाईक व मित्रांची एकूण 13 लाख 36 हजार 660 रुपयांची
आर्थिक फसवणूक केली. तसेच सर्वांना बनावट आरटीजीएस स्लीप आणि धनादेश पाठवून पैसे दिल्याचे भासवले.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिली होता.
तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चोरमले (API Chormale) करीत आहेत.

Related Posts