IMPIMP

Pune Crime News | पत्नीच्या भावानेच फसवलं ! सॉफ्टवेअर इंजिनिअरची 28 लाखाची घरातील समस्या दूर करण्याच्या नावाखाली फसवणूक

by nagesh
Pune Crime News | 28 lakh fraud of a software engineer in the name of solving a problem at home

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | घरावर विघ्न आले आहे. त्या दूर करण्यासाठी विविध धार्मिक विधी व जादुटोणा करावा लागेल, असे सांगून एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअरला (Software Engineer) पत्नीच्या नातेवाईकानेच ज्योतिषाच्या मदतीने २० लाख रुपये तसेच २५ तोळे सोने घेऊन फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत विश्रांतवाडी पोलिसांनी अभिषेक कुलकर्णी काका Abhishek Kulkarni Kaka (वय ३५), विजय गोविंद जाधव Vijay Govind Jadhav (वय ३०, रा. इंदापूर), सदाशिव फोडे Sadashiv fhode (वय ३७, रा. इंदापूर) यांच्यावर नरबळी व इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी कृत्य प्रतिबंध निर्मुलन व काळा जादु अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे (Black Magic Act).
याबाबत धानोरी येथील एका ३३ वर्षाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरने
विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १८९/२३) दिली आहे. हा प्रकार मार्च २०२१ ते ऑगस्ट २०२१ दरम्यान सुरु होता. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नीचा नातेवाईक असलेल्या विजय जाधव याने तुमच्या घरातील समस्या दूर करण्यासाठी धार्मिक विधी करावे लागतील, असे सांगितले.
त्यासाठी अभिषेक काका व सदाशिव फोडे यांच्याशी संगनमत केले.
फिर्यादी यांना विश्वासात घेऊन वेळोवेळी धार्मिक विधी व जादुटोण्याचे उपाय करण्यासाठी त्यांच्याकडून २० लाख ३५ हजार रुपये घेतले.
पूजा करण्यासाठी त्यांनी गव्हाच्या कणकेचा पुतळा बनवून त्याला दागिने घालण्यास सांगितले.
दागिन्यासहीत पुतळा पुजेसाठी मठात घेऊन गेले. त्यानंतर ते परत आले नाही. दरम्यान लॉकडाऊन सुरु झाल्याने नंतर पैसे, दागिने देतो,
असे सांगून टाळाटाळ करत होते. शेवटी या सॉफ्टवेअर इंजिनिअरने पोलिसांकडे (Pune Police) धाव घेऊन तक्रार दिली आहे.

Web Title : Pune Crime News | 28 lakh fraud of a software engineer in the name of solving a problem at home

Related Posts