IMPIMP

Pune Crime News | स्वारगेट येथील ट्रान्सपोर्ट कंपनीला इंदौर मधील दाम्पत्याकडून 48 लाखांचा गंडा

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये टीम लीडर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने खोट्या नोंदी दाखवून कंपनीच्या नफ्यातून तसेच अ‍ॅमेझॉन कंपनी (Amazon Company) कडून मिळालेल्या रकमेमधून 48 लाख 64 हजार 550 रुपयांचा अपहार करुन फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी इंदौर येथील एका दाम्पत्यावर स्वारगेट पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 मे 2022 ते मार्च 2023 दरम्यान ट्रोकोलॉजी प्रा. लि. गुलटेकडी (Trochology Pvt. Ltd. Gultekdi), स्वारगेट या ट्रान्सपोर्ट कंपनीत घडला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत करण किर्तीकुमार बोथरा (वय-28 रा. सम्मेत बिल्डींग, मुकुंदनगर, पुणे) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार सुरज परिमल कुंडु व निकीता सुरज कुंडु (रा. इंदौर, मध्य प्रदेश) यांच्यावर आयपीसी 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी बोथरा यांची ट्रोकोलॉजी प्रा. लि. नावाची पुण्यातील गुलटेकडी येथे कंपनी आहे. सुरज कुंडू हा फिर्यादी यांच्या कंपनीमध्ये काम करत असून त्याच्याकडे गुजरात येथील टीम लीडर पदाची जबाबदारी होती. तसेच त्याच्यावर इंदौर येथील ट्रान्सपोर्टचे काम पाहण्याची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली होती. (Pune Crime News)

आरोपी सूरज याने ट्रान्सपोर्टच्या व्यवहारात वाहनांची संख्या वाढवल्याचे दाखवले. त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरून
कंपनीच्या झोनल मॅनेजरला पाठवले. त्यानंतर कनिष्का लॉजी या कंपनीला (Kanishka Loggy Company) आणि
निकीता कुंडू हिच्या मालकीच्या एन विंग्ज ट्रान्स लॉजीस्टीक सोल्युशन (N Wings Trans Logistics Solutions)
या कंपनीला फिर्यादी यांच्या कंपनीच्या नफ्यातून उकळलेले पैसे पाठवले. तसेच अ‍ॅमेझॉन कंपनीकडून आलेली रोख
रक्कम देखील त्याने स्वत:कडे ठेवून कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे (Sr PI Sunil Zaware) करीत आहेत.

Related Posts