IMPIMP

Pune Police News | दिवाळीची खरेदी केलेली बॅग विसरली, फरासखाना पोलिसांनी रिक्षाचा शोध घेऊन परत केली

by sachinsitapure
Faraskhana Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Police News | दिवाळीनिमित्त खरेदी केलेल्या कपड्यांची बॅग रिक्षात विसरली. फरासखाना पोलिसांनी रिक्षाचा क्रमांक शोधून रिक्षात विसरलेली कपड्यांची बॅग सोमवारी (दि.30) परत केली. ही घटना रविवारी (दि.29) सायंकाळी चारच्या सुमारास फरासखाना पोलीस ठाण्याच्या (Faraskhana Police Station) हद्दीत घडली होती. (Pune Police News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

सागर मच्छिंद्र बनकर (रा. वाघोली) हे रविवारी कुटुंबासह पुण्यात दिवाळीची खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांनी मुलचंद मिल येथून घरच्यांसाठी दिवाळीसाठी कपडे खरेदी केले. त्यानंतर दत्त मंदिर येथून रिक्षात बसून कुंभारवाडा चौक येथे उतरले. रिक्षातून उतरत असताना खरेदी केलेल्या 9,238 रुपये किंमतीच्या साड्यांची बॅग रिक्षात विसरली. बॅग रिक्षात विसरल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेत कपड्यांची बॅग रिक्षात विसरल्याची तक्रार दिली.

फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा (Sr. PI Dadasaheb Chudappa),
पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप (PI Mangesh Jagtap), पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर (PI Anita Hivarkar)
व तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड (API Vaibhav Gaikwad) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस अंमलदार संदीप कांबळे यांनी दत्त मंदिर चौक ते कुंभार वेस चौक यादरम्यान असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून रिक्षाचा क्रमांक ट्रेस करुन रिक्षा चालकाला शोधून काढले. पोलिसांनी रिक्षात विसरलेली कपड्यांची बॅग सागर बनकर यांना परत केली. (Pune Police News)

बनकर कुटुंब दिवाळीची खरेदी करण्यासाठी पुण्यात आले होते. दिवाळीसाठी कपडे खरेदी केले मात्र बॅग रिक्षात विसरली.
पोलिसांनी रिक्षात विसरलेली कपड्यांची बॅग पुन्हा परत मिळवून दिल्याबद्दल बनकर कुटुंबाने फरासखाना पोलिसांचे
आभार मानले.

Related Posts