IMPIMP

Pune Crime News | ‘पठाण’चे पोस्टर फाडणार्‍या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

by nagesh
  Pune Crime News | A case has been registered against Bajrang Dal activists who tore down the poster of 'Pathan'

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | राहुल चित्रपटगृहाच्या (Rahul Cinema, Pune) आवारात शिरुन तेथील ‘पठाण’ चित्रपटाची बॅनर (Pathan Movie Banner) फाडून घोषणाबाजी करणार्‍या बजरंग दलाच्या (Bajrang Dal) कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बजरंग दलाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहसचिव नितीन महाजन व त्यांच्या १५ ते १९ कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलिसांनी (Shivajinagar Police Station) गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस शिपाई अंकुश कोल्हे यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार राहुल चित्रपटगृहात रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडला होता.

 

पठाण चित्रपटातील एका गाण्यात दीपिका पादुकोन हिने भगवी वस्त्रे घालून अश्लिल नृत्य केल्याने
हिंदुत्ववादी संघटना खवळल्या असून त्यांनी या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.
पठाण चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याचे पोस्टर राहुल चित्रपटगृहात लावण्यात आले होते.
हे समजल्यावर बजरंग दलाचे काही कार्यकर्ते तेथे जमले व त्यांनी पोस्टर फाडून शाहरुख खान विरोधात
घोषणाबाजी केली. त्यामुळे गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title :-  Pune Crime News | A case has been registered against Bajrang Dal activists who tore down the poster of ‘Pathan’

 

हे देखील वाचा :

BJP MLA Ashish Shelar | ‘आजही शेठजी उद्धव ठाकरेंचं लक्ष ठेकेदारांचे पैसे परत देण्यावर’, आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

IND VS NZ | टीम इंडिया श्रीलंकेनंतर न्यूझीलंडला व्हाईट वॉश देणार?

Nagpur Crime | उधारीचे पैसे मागितले म्हणून तरुणावर वार; नागपूरमधील घटना

 

Related Posts