IMPIMP

Pune Crime News | शिवीगाळ करु नका सांगितल्याच्या कारणावरुन वार

by sachinsitapure
Attempt to kill

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | हॉटेलच्या बीलावरुन शिवीगाळ करत असताना शिवीगाळ करु नका येथे महिला आहेत, असे सांगितल्याचा राग आल्याने तिघांनी बिअरच्या बाटलीने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. याप्रकरणी तिघांवर मुंढवा पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.8) रात्री अकराच्या सुमारास धायरकर वस्ती येथील हॉटेल बझुका (Hotel Bazooka) येथे घडली. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत भैरवनाथ बाबुराव साळुंखे (वय-36 रा. धायरकर वस्ती, मुंढवा रोड, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मंगेश तांबे, अक्षय गागडे, गोट्या (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर आयपीसी 307, 336, 352, 504, 506, 427, 34 सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट (Criminal Law Amendment Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
शुक्रवारी रात्री फिर्य़ादी त्यांच्या पत्नीसोबत हॉटेल बझुका येथे जेवण करण्यासाठी गेले होते.
त्यावेळी आरोपींचे बील देण्यावरुन आपापसात वाद सुरु होता. याच वादातून शिवीगाळ करत असताना फिर्यादी
यांनी शिवीगाळ करु नका, येथे लेडीज आहेत असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी रिकामी बीअरची बाटली फोडून फिर्य़ादी यांच्यावर तीन वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच हातातील फुटलेली बाटली हवेत फिरवून आरडाओरडा करुन हॉटेलमधील ग्राहक व कर्मचाऱ्यांना धमकावून दहशत निर्माण केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महानोर (API Mahanor) करीत आहेत.

Related Posts