IMPIMP

Pune Crime News | वडिलांच्या मृत्युनंतर ५१ वर्षाच्या सावत्र मुलाने लाटले तब्बल ११ कोटी रुपये; बनावट मेल आयडी तयार करुन केली फसवणूक

by nagesh
Pune Crime News | 10 percent interest on money given for trading! 99 lakhs fraud by loss, case filed in Chandannagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime News | पतीने भविष्याकरीता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुक (Mutual Fund Investment) केलेली असताना त्यांच्या मृत्युनंतर सावत्र मुलाने वडिलांच्या नावाने बनावट ई मेल तयार करुन म्युच्युअल फंडाची ११ कोटी ४० लाख २८ हजार ३६४ रुपयांची फसवणूक (Cheating Case) केली असल्याचे समोर आले आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी औंध येथील नॅशनल सोसायटीत राहणार्‍या एका ७० वर्षाच्या महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२०/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मुकुंद अशोक कैरे (वय ५१, रा. टॉपवर अपार्टमेंट, नोएडा, उत्तर प्रदेश) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार ९ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२० दरम्यान घडला. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पतीने भविष्याकरीता म्युच्युअल फंड खात्यात ११ कोटी ४० लाख रुपयांची गुंतवणूक केली होती.
मृत्युच्या वेळी ती त्यांच्या ताब्यात होती.
त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या ऑगस्ट २०२० मध्ये मुकुंद कैरे याने वडिलांच्या नावाने बनावट ई मेल आय डी तयार केला.
त्याद्वारे त्यांनी वेगवेगळ्या म्युच्युअल फंड अकाऊंटचा अशोक कैरे यांचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर बदलून त्याजागी स्वत:चा मोबाईल नंबर टाकला.
तो अशोक कैरे यांचा असल्याचे भासवून रजिर्स्टड केला.
त्यानंतर त्यांनी या बनावट ई मेल व बदलेला मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करुन या म्युच्युअल फंड खात्याील सर्व रक्कमा स्वत:च्या बँक खात्यात जमा करुन घेतले.
या फसवणूकीची (Fraud Case) माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेऊन तक्रार दिली.
त्यानंतर आता न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक झरेकर तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | After the death of his father, the 51-year-old stepson lost Rs 11 crore; Fraud by creating fake mail id

 

हे देखील वाचा :

IND vs AUS | रोहितने संघ निवडताना ऑस्ट्रेलियाला धक्का देत ‘या’ दोन खेळाडूंना दिली पदार्पणची संधी

Osmanabad News | उस्मानाबादमध्ये उरुसासाठी जमलेल्या गर्दीत वळू उधळून 14 भाविक जखमी

Parbhani Crime News | धक्कादायक ! जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहित महिलेचा केला गर्भपात

 

Related Posts