IMPIMP

Osmanabad News | उस्मानाबादमध्ये उरुसासाठी जमलेल्या गर्दीत वळू उधळून 14 भाविक जखमी

by nagesh
Osmanabad News | 14 devotees injured in osmanabad bull rushes in crowd gathered for urus

उस्मानाबाद :  सरकारसत्ता ऑनलाईन – Osmanabad News | उस्मानाबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये उरूस सुरु असताना अचानक वळू उधळल्याने 14 भाविक जखमी झाले आहेत. यामधील जखमींना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हि घटना घडली तेव्हा त्या ठिकाणी जवळपास 15 हजार भाविक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान वळू अचानक उधळल्याने भाविकांची धावपळ उडाली आणि मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Osmanabad News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय घडले नेमके?
उस्मानाबाद शहरात सध्या हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांचा उरूस सुरू आहे. हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या धार्मिक सोहळ्यानिमित्त उस्मानाबादमध्ये हा उरुस असतो. दोन ते तीन दिवस हा उरुस चालतो. रात्रभर या उरुसात सहभागी होण्यासाठी भाविक गर्दी करत असतात. या उरुसाच्या कार्यक्रमासाठी विविध ठिकाणाहून तब्बल 15 हजार लोक आले होते. तेव्हा आज पहाटे तीनच्या सुमारास धार्मिक कार्यक्रम सुरू असताना अचानक एक अनियंत्रीत झालेला वळू भाविकांमध्ये शिरला. यादरम्यान वळू उधळल्याने भाविकांची मोठी धावपळ उडाली आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 14 भाविक जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Osmanabad News)

 

 

पोलीस घटनास्थळी हजर
या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले.
यावेळी पोलिसांबरोबर वैद्यकीय पथकही घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींपैकी काहीजणांवर उपचार सुरु आहेत.
तर काहीजण उपचार घेऊन घरी परतले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Osmanabad News | 14 devotees injured in osmanabad bull rushes in crowd gathered for urus

 

हे देखील वाचा :

Parbhani Crime News | धक्कादायक ! जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहित महिलेचा केला गर्भपात

Pune Crime News | कोल्ड्रींगमधून गुंगीचे औषध टाकून महिलेवर केला बलात्कार; जबरदस्तीने लग्न करायला लावून मारहाण करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime News | फुरसुंगी रोडवरील लॉजवर छापा, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ‘सासु’ने केली 5 महिलांची सुटका

 

Related Posts