IMPIMP

IND vs AUS | रोहितने संघ निवडताना ऑस्ट्रेलियाला धक्का देत ‘या’ दोन खेळाडूंना दिली पदार्पणची संधी

by nagesh
IND vs AUS | ind vs aus nagpur test team india playing 11 for 1st test match suryakumar yadav and ks bharat debut

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन  IND vs AUS | आजपासून मानाच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात भारताकडून दोन खेळाडूंनी कसोटीत पदार्पण केले. रोहितच्या या संघनिवडीमुळे ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) मोठा धक्का बसला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोण आहेत ते दोन खेळाडू?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात सूर्यकुमार यादव आणि यष्टिरक्षक केएस भरत यांनी भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण केले आहे. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सूर्यकुमार यादवला कसोटी कॅप दिली तर फलंदाज चेतेश्वर पुजाराने केएस भरतला कसोटी कॅप दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी इशान किशनच्या जागी केएस भरतला कसोटी कॅप देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. तर दुसरीकडे सूर्यकुमार यादव सध्या टी-20 फॉरमॅटमध्ये अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने भारतासाठी 48 टी-20 सामने खेळले असून 46.53 च्या सरासरीने 1675 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतके आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच सूर्याने भारताकडून 20 एकदिवसीय सामने खेळले असून त्यामध्ये 433 धावा केल्या आहेत. आता सूर्या हाच कसोटीमध्ये आपला जलवा दाखवण्यात कितपत यशस्वी होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (IND vs AUS)

 

 

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर),
रविंद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

 

भारत – ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक
पहिली टेस्ट- 9 ते 13 फेब्रुवारी, नागपुर
दूसरी टेस्ट- 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली
तिसरी टेस्ट- 1 ते 5 मार्च, धर्मशाला
चौथी टेस्ट- 9 ते 13 मार्च, अहमदाबाद

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- IND vs AUS | ind vs aus nagpur test team india playing 11 for 1st test match suryakumar yadav and ks bharat debut

 

हे देखील वाचा :

Osmanabad News | उस्मानाबादमध्ये उरुसासाठी जमलेल्या गर्दीत वळू उधळून 14 भाविक जखमी

Parbhani Crime News | धक्कादायक ! जीवे मारण्याची धमकी देऊन विवाहित महिलेचा केला गर्भपात

Pune Crime News | कोल्ड्रींगमधून गुंगीचे औषध टाकून महिलेवर केला बलात्कार; जबरदस्तीने लग्न करायला लावून मारहाण करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल

 

Related Posts