IMPIMP

Pune Crime News | पुणे कॅम्पातील जागा बळकावण्याचा प्रयत्न, 11 जणांवर FIR

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | मागील अनेक वर्षापासून भाड्याने राहत असलेल्या भाडेकरुने जागा बळकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी 11 जणांवर लष्कर पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै 2022 पासून आजपर्य़ंत पुणे कॅम्पातील एन.पी. एस.लाईन्स ईस्ट स्ट्रीट येथे घडला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत कुवर फिरोज दारुवाला (वय-64 रा. एन.पी. एस.लाईन्स ईस्ट स्ट्रीट, पुणे कॅम्प) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात (Lashkar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोहाना रॉबीन अॅन्ड्रुस Sohana Robin Andrews (वय-43), राजश्री शशिकांत संगपॉल, शकुंतला रेड्डी, संजय मेहता, रेश्मा बोरा, बाळु व इतर 5 अनोळखी व्यक्तींवर आयपीसी 336, 341, 384, 385, 427, 447, 448, 452, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुवर दारुवाला यांची पुणे कॅम्पातील एन.पी. एस.लाईन्स ईस्ट स्ट्रीट येथे
वडिलोपार्जित जागा आहे. या जागेत आरोपी सोहाना अ‍ॅन्ड्रुस यांचे वडील रॉबीन अ‍ॅन्ड्रुस हे मागील 20 वर्षापासून
भाडेकरु म्हणून राहत आहेत. याबाबत सोहाना यांना माहिती होती. आरोपींनी फिर्यादी यांची जागा बळवावण्याच्या उद्देशाने त्रास दिला. तसेच फिर्यादी यांना गार्डनमध्ये जाण्यास मज्जाव करुन जागेत घुसखोरी केली. तर इतर आरोपींनी फिर्यादी यांना धमक्या देऊन मालमत्ता बळकावण्याची भीती दाखवून जागेवर हक्क सांगण्याचा प्रयत्न केला. याबाबत फिर्य़ादी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार लष्कर पोलिसांनी सीआरपीसी कलम 156(3) नुसार 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Posts