IMPIMP

Pune Crime News | पगारावरून वाद झाल्याने मालकाने केला कामगाराचा खून; राष्ट्रवादीच्या दयानंद इरकल याच्यासह 13 जणांविरुद्ध गुन्हा

by sachinsitapure
Murder In Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | मशिन ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मालकाने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. मॉडेल कॉलनी भागात हा प्रकार घडला आहे. सदर कर्मचाऱ्याला चक्कर आल्याने तो पडला असा बनाव आरोपींनी रचला होता. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यासह १३ जणांविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

खून झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव अविनाश भिडे (वय ३६, रा. बेनकर वस्ती, धायरी, सिंहगड रस्ता) असे आहे. याबाबत भिडे यांच्या पत्नी रेखा (वय ३०) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

या प्रकरणात पोलिसांनी शेखर महादेव जोगळेकर (वय ५८), प्रणव शेखर जोगळेकर (वय २२, दोघे रा. सुदर्शन सोसायटी, मॉडेल कॉलनी), राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी दयानंद सिद्राम इरकल Dayanand Irkal (रा. पांडवनगर) आणि बाळू पांडुरंग मिसाळ (रा. काकडे पॅलेसजवळ, कर्वेनगर), प्रमोद श्रीरंग शिंदे (रा. शिवणे), रुपेश रवींद्र कदम, संतोष उर्फ बंटी दत्तात्रय हरपुडे, प्रकाश नाडकर्णी, नकुल शेंडकर यांना अटक केली आहे. मॉडेल कॉलनी येथे आरोपी शेखर जोगळेकर याच्याकडे अविनाश भिडे मशिन ऑपरेटर म्हणून काम करत होते. त्यांच्यात पगारावरून वाद झाला होता. ३१ ऑगस्ट २०२२ रोजी जोगळेकरने भिडे यांना फोन करून दुसऱ्या दिवशी लवकर कामावर बोलावले. त्याप्रमाणे भिडे लवकर कामाला आले.

दरम्यान, भिडे यांच्या पत्नीला सकाळी साडेदहाच्या सुमारास फोन आला,
आणि त्यांना सांगण्यात आले की चक्कर आल्याने भिडे हे कार्यालयात पडले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
त्यानंतर भिडे यांच्या पत्नी रेखा रुग्णालयात गेल्या. तेव्हा कंपनीचा मालक शेखर जोगळेकर तिथे होता. दरम्यान,
भिडे यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. जोगळेकर यांच्या सांगण्यावरुन आरोपी इरकल, मिसाळ, शिंदे, कदम, हरपुडे, नाडकर्णी, शेंडकर यांनी भिडे यांना बेदम मारहाण केल्याचे नंतर तपासात उघड झाले.

पोलिसांनी याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
त्यानंतर शवविच्छेदन अहवालानंतर त्यामध्ये भिडे यांच्या डोक्याला गंभीर जखमी
झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले होते.
त्यानुसार पोलिसांनी तपास करुन गुन्हा दाखल केला.
या खून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जानकर हे करत आहेत.

Related Posts