IMPIMP

Pune Crime News | दुकानाच्या व्यवहारावरुन पार्किंगमधील गाड्यांना लावली आग; अगोदर सीसीटीव्हीची वायर ठेवली कापून

by sachinsitapure
Pune Crime News | Cars in the parking lot were set on fire by shop transactions; Cut the CCTV wire first

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | दुकानाच्या विक्री व्यवहारावरुन झालेल्या वादातून चौघांनी इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्यांना आग लावून देण्याचा प्रकार समोर आला आहे. या आगीत तीन दुचाकी व चार सायकली जाळून गेल्या. ही घटना लोहगावमधील साठेवस्ती येथील बन्सल कॉम्प्लेक्समध्ये सोमवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत नितीन बन्सल (वय ३३, रा. बन्सल भवन, लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संतोष रतन अगरवाल Santosh Ratan Agarwal (वय ४०, रा. येरवडा) व त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बन्सल काम्प्लेक्समधील दुकानाच्या विक्री व्यवहाराच्या कारणावरुन
संतोष अगरवाल व फिर्यादी यांच्यात वाद होता. आरोपीने फिर्यादीचे भाडेकरु ना शिवीगाळ करुन दुकानांना आग
लावण्याची धमकी दिली. त्यानंतर पहाटेच्या सुमारास तो तिघा साथीदारांना घेऊन आला.
त्यांनी सीसीटीव्ही कॅमर्‍याची वायर कपली. बन्सल कॉम्प्लेक्स मध्ये पार्क केलेल्या तीन दुचाकी व चार सायकली यांना
आग लावली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ढावरे तपास करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | Cars in the parking lot were set on fire by shop transactions; Cut the CCTV wire first

 

Related Posts