IMPIMP

Pune Crime News | कारागृह महिला शिपायाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; वरिष्ठ जेलरला अटक

by sachinsitapure
Pune Crime News | Attempt to set fire to the body of a prison woman soldier by pouring petrol on her; Senior jailer arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | एकतर्फी प्रेम (One Sided Love) व्यक्त करुन कारागृह महिलेवर बलात्कार (Rape Case) केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या जेलरने महिलेच्या घरी जाऊन तिच्यावर अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

येरवडा पोलिसांनी (Pune Police) वरिष्ठ जेलर योगेश भास्करराव पाटील Senior Jailer Yogesh Bhaskarrao Patil (वय ५२, रा. जेलर बंगला, जेल वसाहत, कोल्हापूर) याला अटक केली आहे. याबाबत एका ३९ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५६२/२३) दिली आहे. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कारागृह शिपाई (Jail Constable) म्हणून काम करतात.
आरोपी योगेश पाटील याच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे.
पाटील फिर्यादी यांना वारंवार फोन करुन तो गुन्हा मागे घे व माझ्याशी बोल, मी तुझ्याशिवाय जगु शकत नाही,
असे बोलत असे. सोमवारी १४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या कामावरुन घरी येत
असताना त्याने फिर्यादी यांना गाठले. मला माहिती आहे तू भाड्याचे घरात राहतेस.

आधीच तुझ्या इज्जतीची थु थु झाली आहे. तुला इथे लोक राहू देणार नाहीत. माझ्याबरोबर शांत चल,
असे बोलून फिर्यादीच्या घरी आला. फिर्यादीचे घरातील वॉशिग मशीन घेऊन गेला.
काही वेळाने परत हातामध्ये प्लॅस्टिकचे बाटलीत पेट्रोल घेऊन आला. तू माझी झाली नाही तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही, असे म्हणून फिर्यादीच्या अंगावर पेट्रोल टाकून काड्याची पेटी काढून तिने पेटविण्याचा प्रयत्न करु लागला. तेव्हा फिर्यादी यांनी त्याला धक्का देऊन आतील खोलीत जाऊन दरवाजा लावून घेऊन स्वत:चा जीव वाचविला आहे. पोलिसांनी या जेलरला अटक केली असून पोलीस निरीक्षक जाधव (Police Inspector Jadhav) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Attempt to set fire to the body of a prison woman soldier by pouring petrol on her; Senior jailer arrested

 

Related Posts