IMPIMP

Pune Metro Time Table | पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या बदल

by sachinsitapure
Pune Metro Time Table | Pune Metro Schedule Changes, Know Changes

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Metro Time Table | पुणे मेट्रो आता सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत सुरू राहणार आहे. पुणे मेट्रो आपली प्रवासी सेवा प्रवाशांच्या सोयीसाठी सकाळी 1 तास लवकर सुरू करीत आहे. हा बदल वनाझ स्थानक (Vanaz Station) ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक (Ruby Hall Clinic Station) या मार्गावर लागू करण्यात आला आहे. (Pune Metro Time Table)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक (PCMC Station) ते सिव्हिल कोर्ट स्थानकाच्या (Civil Court Station) वेळेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या मार्गावरील सेवा सकाळी 7 ते रात्री 10 अशीच सुरू असणार असल्याचे मेट्रो प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे मेट्रोची (Pune Metro) वारंवारता पुढीलप्रमाणे असेल

वनाझ स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक मार्ग

सकाळी 6 ते 8 – दर 15 मिनिटांनी
स. 8 ते 11 – दर 10 मिनिटांनी
सकाळी 11 ते दुपारी 4 – दर 15 मिनिटांनी
दुपारी 4 ते रात्री 8 – दर 10 मिनिटांनी
रात्री 8 ते 10 – दर 15 मिनिटांनी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते सिव्हिल कोर्ट स्थानक मार्ग

सकाळी 7 ते 8 – दर 15 मिनिटांनी
स. 8 ते 11 – दर 10 मिनिटांनी
सकाळी 11 ते दुपारी 4 – दर 15 मिनिटांनी
दुपारी 4 ते रात्री 8 – दर 10 मिनिटांनी
रात्री 8 ते 10 – दर 15 मिनिटांनी

Web Title : Pune Metro Time Table | Pune Metro Schedule Changes, Know Changes

Related Posts