IMPIMP

Pune Crime News | हाफ मर्डरच्या गुन्ह्यातील फरारी तडीपार गुन्हेगार चंदननगर पोलिसांकडून अटक

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police arrests wanted Criminal in attempt to murder case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | चंदननगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या (Attempt To Murder) गुन्ह्यातील फरारी तडीपार गुन्हेगारास चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police Station) अटक केली आहे. तो गेल्या 6 महिन्यांपासुन फरार होता. (Pune Crime News)

सुफियान शब्बीर खान Sufiyan Shabbir Khan (24, रा. जिनेश शाळेशेजारी, खांदवेनगर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चंदननगर पोलिस स्टेशनमधील पोलिस अंमलदार आणि पोलिस अधिकारी परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार गणेश हांडगर यांना त्यांच्या गोपीनिय बातमीदारामार्फत एकजण चंदननगर परिसरातील नागपाल रोडवर संशयितरित्या उभा असल्याची माहिती मिळाली. (Pune Crime News)

पोलिसांनी सापळा रचुन त्याला ताब्यात घेतले. सुफियान शब्बीर खान हा चंदनगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या खुनाच्या गुन्हयात गेल्या 6 महिन्यापासून फरार होता. तसेच त्याला तडीपार देखील करण्यात आलेले होते.

पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate),
सहाय्यक पोलिस आयुक्त संजय पाटील (ACP Sanjay Patil)
यांच्या सुचनेप्रमाणे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे (Sr PI Rajendra Landge),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर (PI Jagannath Jankar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अरविंद कुमरे (PSI Arvind Kumre) , पोलिस उपनिरीक्षक दिलीप पालवे (PSI Dilip Palve), पोलिस अंमलदार सुहास निगडे, सचिन रणदिवे, अविनाश संकपाळ, श्रीकांत शेंडे, शिवाजी धांडे, महेश नाणेकर, नामदेव गडदरे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, शेखर शिंदे, सुभाष आव्हाड, विकास कदम आणि गणेश हांडगर यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.

Web Title : Pune Crime News | Chandannagar Police arrests wanted Criminal in attempt to murder case

Related Posts