IMPIMP

Pune Crime News | भारती विद्यापीठ पोलिसांकडून 6 महिन्यांपासून ‘मोक्का’मध्ये फरारी असलेल्याला अटक

by nagesh
Pune Crime News | Bharti Vidyapeeth Police arrested Criminal Who Abscond In MCOCA

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | मोक्काच्या गुन्ह्यात MCOCA (Mokka) गेल्या 6 महिन्यापासुन फरार असलेल्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. तो फरारी काळात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ओळख लपवून आणि ठिकाण बदलुन वास्तव्यास होता. (Pune Crime News)

 

साकीब मेहबुब चौधरी उर्फ लतिफ बागवान Saqib Mehbub Chowdhary alias Latif Bagwan (23, रा. लुनिया बिल्डींग, कदम चाळ, संतोषनगर, कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गुन्हा घडल्यापासुन तो फरार होता. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमधील अधिकारी व पोलिस अंमलदार हे त्याचा शोध घेत होते. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

आरोपीची गोपनिय बातमीदारांकडून माहिती घेवून तसेच तांत्रिक विश्लेषणावरून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस अंमलदार विक्रम सावंत, अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे यांना आरोपीबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी निरा (ता. पुरंदर) येथे जावून आरोपीचा शोध घेतला.

तो निरा परिसरात आढळून आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil), पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil), सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार (Sr PI Vijay Kumbhar),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक (PI Vijay Puranik),
सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ (API Amol Rasal),
पोलिस उपनिरीक्षक सागर भोसले (PSI Sagar Bhosale), पोलिस अंमलदार विक्रम सावंत,
अभिजीत जाधव, निलेश ढमढेरे, चेतन गोरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे,
अवघुत जमदाडे, सचिन सरपाले, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी,
अशिष गायकवाड आणि राहुल तांबे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.

Web Title : Pune Crime News | Bharti Vidyapeeth Police arrested Criminal Who Abscond In MCOCA

Related Posts