IMPIMP

Pune Crime News | सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तांची फसवणूक; आर्थिक नुकसान करण्याची धमकी देऊन खंडणी उकळली

by nagesh
Pune Crime News | Cheating With Retired Assistant Commissioner of Police; Extortion was threatened with financial loss

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime News | भोर (Bhor Taluka News) येथे स्वस्त दरात शेतजमीन विकत घेऊन देतो, असे सांगून ६० लाख रुपये घेऊन जमीन न देता फसवणूक (Cheating Case) केली. पैसे परत मागितल्यावर सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तालाच (Retired ACP) धमकावून आर्थिक नुकसान करण्याची भिती घालून आणखी ६ लाख रुपयांची खंडणी (Extortion Case) उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्ताने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station ) फिर्याद (गु. रजि. नं. १९४/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजेश अंकुश पोटे (Rajesh Ankush Pote), संदेश अंकुश पोटे (Sandesh Ankush Pote), प्रियांका निलेश सूर्यवंशी Priyanka Nilesh Suryavanshi (सर्व रा. कुदळे पाटील रेसिडेन्सी, वडगाव बुद्रुक – Vadgaon Budruk, Pune) यांच्यावर गुन्हा  (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०१५ पासून सुरु होता. (Pune Crime News)

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश पोटे, संदेश पोटे व प्रियांका सूर्यवंशी यांनी फिर्यादी यांचा
विश्वास संपादन करुन भोर येथे स्वस्त दरात शेतजमीन विकत घेऊन देतो, असे सांगितले.
त्यासाठी त्यांच्याकडून ६० लाख रुपये घेतले. मात्र, त्यांना कोणती शेतजमीन खरेदी करुन दिली नाही.
त्यांनी पैसे परत मागितल्यावर त्यांच्या भोसलेनगर येथील राहत्या घरी येऊन त्यांना पैसे देत नसल्याचे धमकावले.
आर्थिक नुकसान करण्याची भिती घातली.
ते सहायक पोलीस आयुक्त असताना मार्च २०२१ मध्ये आणखी ६ लाख रुपयांची खंडणी (Ransom) घेतली.
या पोलीस अधिकार्‍याने निवृत्त झाल्यानंतर आता याप्रकरणी तक्रार अर्ज दिला असून त्यानुसार फसवणूक
(Fraud Case) व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे (PSI Shinde) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Pune Crime News | Cheating With Retired Assistant Commissioner of Police; Extortion was threatened with financial loss

 

हे देखील वाचा :

Sangli Accident News | भरधाव कार रसवंतीगृहात घुसल्याने शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Shahid Hemu Kalani | भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत अमर शहीद हेमू कलानी यांचे अभूतपूर्व योगदान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra State Skills University | महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, पनवेल आयटीआय इमारतीचे राज्यपालांच्या हस्ते होणार भूमीपूजन

 

Related Posts