IMPIMP

Pune Crime News | रिक्षा चोरी करणाऱ्या आरोपीला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

by nagesh
Pune Crime News | Kondhwa: Arrested three people who beat the investigating beat marshal police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime News | पुणे शहरामध्ये वाहन चोरीच्या (Vehicle Theft) गुन्ह्यामध्ये वाढ होत असून वाहन चोरी करणाऱ्या चोरट्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. याच दरम्यान दत्तवाडी पोलिसांनी एका वाहन चोराचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे (Technical Analysis) शोध घेऊन अटक (Arrest) केली. त्याच्याकडून दोन लाख रुपये किमतीची एक रिक्षा जप्त (Rickshaw Seized) केली आहे. ही कारावाई (Pune Crime News) मंगळवारी (दि.23) आदर पुनावाला गेट, मांजरी रोड येथे केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दत्तवाडी पोलीस ठाण्यातील (Dattawadi Police Station) तपास पथकाचे अधिकारी कर्मचारी हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे व किशोर वळे यांनी गाडीच्या चोरीच्या ठिकाणापासून तांत्रिक विश्लेषण केले असता ही रिक्षा (एमएच 12 टीयु 6344) मांजरी हडपसर परिसरात असल्याची माहिती मिळाली. तपास पथकाने सलग दोन दिवस हडपसर, मांजरी, गोपाळपट्टी, सोलापूर रोड येथे थांबून रिक्षाचा शोध घेतला. मंगळवारी एक नविन विना नंबरची रिक्षा गोपाळपट्टी कडून मांजरीच्या दिशेने जाताना दिसली. पोलिसांनी रिक्षाचा पाठलाग करुन पकडली. (Pune Crime News)

 

आरोपीकडे रिक्षाचे कागदपत्रांसदर्भात चौकशी केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. तसेच रिक्षाच्या चलाकाच्या शिटखाली लॉकच्या कप्प्यात रिक्षाचे दोन नंबर प्लेट आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांचा आरोपीवर संशय बळावल्याने त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने अशा प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करीत आहेत.

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे
(Addl CP Rajendra Dahale), पोलीस उपायुक्त सहेल शर्मा (DCP Suhail Sharma),
सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन (Senior Police Inspector Abhay Mahajan),
पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे (Police Inspector Vijay Khomene),
तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे (PSI Chandrakant Kamthe), पोलीस अंमलदार प्रकाश मरगडे, किशोर वळे, कुंदन शिंदे, अमित सुर्वे, अमोल दबडे, सद्दाम शेख, अनिस तांबोळी, दयानंद तेलंगे पाटील, नवनाथ भोसले, प्रशांत शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला, प्रमोद भोसले, ज्ञानेश्वर शिंदे यांच्या पथकाने केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | Dattawadi police arrested the accused of stealing a rickshaw

 

हे देखील वाचा :

Pune Traffic News Updates | माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

Jayant Patil | देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर जयंत पाटलांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘लोक फार हुशार आहेत, 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना…’

Devendra Fadnavis | ‘या’ दिवशी होणार राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली तारिख

 

Related Posts