Pune Crime News | पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडून झोन-2 मधील 3 गुन्हेगार तडीपार
पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | झोन-2 च्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil) यांनी गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या 3 गुन्हेगारांवर (Criminals On Pune Police Records) हद्दपारीची कारवाई केली आहे (Tadipar Action). पोलिस स्टेशनकडून प्राप्त झालेल्या तडीपार पस्तावाची चौकशी पुर्ण केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तिघांनाही पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय आणि पुणे जिल्हयातून तडीपार करण्यात आले आहे. (Pune Crime News )
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
लष्कर पोलिस स्टेशनच्या (Lashkar Police Station) हद्दीतील सुमित फ्रॅकी हॉल Sumit Frankie Hall (25, रा. 171, सोलापूर बाजार, कॅम्प, पुणे), सहकारनगर पोलिस स्टेशनच्या (Sahakar Nagar Police Station) हद्दीतील आकाश नामदेव कसबे Akash Namdev Kasbe (27, रा. तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे) आणि कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनच्या (Koregaon Park Police Station) हद्दीतील ऋतिक उर्फ दिघ्या राजेश घाडगे
Hrithik alias Dighya Rajesh Ghadge (21, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क, पुणे) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.
झोन-2 मधील पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डवर खुनाचा प्रयत्न (Attempt To Murder), खंडणी (Extortion), दंगा (Riots), दुखापत,
जबरी चोरी (Robbery), चोरी करणे, गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीररित्या हत्यार बाळगणे, दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे
गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार्यांवर कायद्याचा वचक रहावा म्हणून संबंधित पोलिस स्टेशनने त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडे पाठविला होता. प्रस्तावाची चौकशी पुर्ण केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी
ही कारवाई केली आहे. आगामी काळात देखील पोलिसांच्या रेकॉर्डवरील सक्रिय गुन्हेगारांवर अशाच प्रकारची कारवाई करण्यात
येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
Web Title : Pune Crime News | Deputy Commissioner of Police Smartana Patil externs 3 criminals in Zone-2
Comments are closed.