IMPIMP

Pune Crime News | शुक्रवार पेठ: सासूच्या छळाला कंटाळून विवाहितेची विष पिऊन आत्महत्या

by sachinsitapure
Suicide Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | चारित्र्याचा संशय घेऊन सासुकडून दिल्या जाणार्‍या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने विषारी औषध पिऊन आत्महत्या (Suicide Case) केली. पोलिसांनी सासुविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

सायली सौरभ भागवत Sayli Saurabh Bhagwat (वय २२, रा. शुक्रवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

याबाबत रवी अनिल आहिरे (वय ३९, रा. शुक्रवार पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३०८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजश्री राजेंद्र भागवत Rajshri Rajendra Bhagwat (रा. दत्तवाडी) हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची भाची सायली भागवत हिची सासु तिचे चारित्र्यावरुन संशय घेत होती. तिला झोपडपट्टीत राहणारी चिंधीचोर आहे. तुला स्वयंपाक नीट बनवता येत नाही, असे म्हणून मानसिक व शारीरीक त्रास देऊन उपाशी ठेवत असत. तिला पतीपासून अलिप्त राहण्यास भाग पाडले.
तिला मध्यरात्री २ वाजता घराबाहेर हाकलून दिले होते. या त्रासाला कंटाळून तिने ११ सप्टेंबर रोजी
विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचार सुरु असताना तिचा मृत्यु झाला.
सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे (API Sonwane) तपास करीत आहेत.

Related Posts