IMPIMP

Pune Crime News | बारामती तालुक्यातील खांडजमध्ये गोबरगॅसच्या टाकीत पडून चौघांचा दुर्दैवी मृत्यू, पिता-पुत्राचा समावेश

by nagesh
Pune Crime News | Hadapsar Police Station - Youth commits suicide due to harassment by wife and in-laws; Wife grabbed the house, place through fake documents

बारामती : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime News | बारामती तालुक्यातील (Baramati Crime News) खांडजमध्ये (Khandaj)
गोबरगॅसच्या टाकीत (Gobar Gas Plant ) पडून चौघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना आज (दि.15) घडली आहे. दरम्यान, या घटनेत आणखी एकजण
अत्यवस्थ असून त्यास उपचारासाठी बारामतीमधील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये पिता-
पुत्राचा आणि चुलत्याचा समावेश आहे. (Pune Crime News )

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रकाश सोपान आटोळे, प्रविण भानुदास आटोळे, भानुदास आनंदराव आटोळे व बापुराव लहुजी गव्हाणे असे मृत्यमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, खांडज गावच्या हद्दीतील 22 फाटयाजवळील आटोळेवस्ती येथे ही घटना आज (दि. 15) सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. प्राथमिक माहिती गोबरगॅसच्या टाकीमध्ये पडल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण अत्यवस्थ आहे.

 

चौघांना तात्काळ बारामतीमधील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले आहे.
अत्यवस्थ असणार्‍या एकाला पुढील उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रूग्णालयाच्या परिसरात नागरिकांनी आणि मृतांच्या नातेवाईकांची गर्दी झाली आहे.
पोलिस देखील घटनास्थी दाखल झाले आहेत.

 

 

Web Title : Pune Crime News | Four, including a father and son, died after falling into a gober gas tank in Baramati taluka’s Khandaj Pune Crime News

 

हे देखील वाचा :

Tips For Diabetes In Summer | उन्हाळ्यात डायबिटीज रूग्णांनी आपल्या हाय ब्लड शुगरवर ‘या’ 5 पद्धतीने ठेवावे नियंत्रण, मग येणार नाही अडचण

Weight Loss Without Gym Diet Plan | जिममध्ये न जाता असे कमी करा 5 ते 7 किलो वजन, वेट लॉससाठी खा ‘या’ 6 गोष्टी, वेगाने कमी होईल वजन

Pune Crime News | प्रेमविवाहात फसवणूक करुन धर्मांतर करण्याचा दबाव ! अमेरिकेत नेऊन केला छळ, अमेरिकन पोलिसांच्या मदतीने केली सुटका; डेक्कन पोलिस ठाण्यात 6 जणांवर FIR

 

Related Posts