IMPIMP

Pune Crime News | युरोप टूर्स आयोजित करुन देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक, कर्वेनगर येथील प्रकार

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | युरोपला फिरायला जाण्याचे स्वप्न कर्वेनगर येथील ज्येष्ठ नागरिकाला महागात पडले आहे. युरोप टूर्स (Europe Tours) आयोजित करुन देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक (Fraud) करण्यात आली. तसेच त्यांच्या जावयाचे व्हिसाचे (Visas) काम करुन देतो असे सांगून त्यांचीही आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार (Pune Crime News) 18 मार्च 2023 ते 30 मे 2023 या कालावधीत कर्वेनगर (Karve Nagar) येथे घडला आहे.

 

याबाबत गिरीधर दौलतराव खैरनार Giridhar Daulatrao Khairnar (वय-62 रा. कर्वेनगर) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मिलिंद मधुकर जोशी Milind Madhukar Joshi (रा. कृष्ण पिंगाक्ष, शहाजीराजे भोसले नगर, हडपसर) याच्यावर आयपीसी 406, 409 419, 420 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)

 

आरोपीने फिर्यादी यांना युरोप टूर्स आयोजित करुन देते असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांनी युरोप टूर्ससाठी मिलिंद जोशी याला वेळोवेळी ऑनलाईन 4 लाख 62 हजार 600 तसेच रोख 50 हजार रुपये दिले. आरोपीने फिर्यादी यांच्याकडून 5 लाख 12 हजार 600 रुपये घेतले. तसेच फिर्यादी यांचे जावई देवेंद्र कुलकर्णी (Devendra Kulkarni) यांना व्हिसाचे काम करुन देतो असे सांगून त्यांच्याकडून 1 लाख 90 हजार रुपये घेतले.

आरोपी मिलिंद जोशी याने फिर्यादी यांच्याकडून युरोप टुर्ससाठी पैसे घेतले मात्र त्यांना टुर्सवर पाठवले नाही.
फिर्यादी यांनी युरोपला जाण्यासाठी लागणारी कागदपत्रे देऊन ही आरोपीने टुर्सचे आयोजन केले नाही.
त्यामुळे फिर्यादी यांनी याबाबत पाठपुरवा केला असता आरोपीने पैसे परत देतो असे सांगितले.
परंतु त्याने फिर्यादी व त्यांच्या जावयाचे पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील (API Patil) करीत आहेत.

Related Posts