IMPIMP

Pune Crime News | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी; हडपसर परिसरातील घटना; अल्पवयीन मुलगा ताब्यात

by sachinsitapure
Minor

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | अल्पवयीन मुलीला स्वत:चे जीवाचे बरेवाईट करुन घेण्याची धमकी देऊन तिचा पाठलाग करुन विनयभंग (Molestation) केल्याची घटना हडपसर परिसरातील काळेपडळ येथे घडली आहे. हा प्रकार मागील दोन वर्षांपासून सुरु होता. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Pune Police) एका अल्पवयीन मुलाला (Minor) ताब्यात घेतला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत पीडीत अल्पवयीन मुलीच्या आईने (वय-31) वानवडी पोलीस ठाण्यात (Wanavadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर आयपीसी 354 (अ), 354(ड), 504, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा (FIR) दाखल करुन ताब्यात घेतले आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 15 वर्षाच्या मुलीला आरोपीने स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करण्याची
धमकी दिली. तसेच तिला वारंवार फोन करुन आणि मेसेज करून तिची छळवणूक केली.
तर तिचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केला. याबाबत पीडित मुलीचे आई-वडील आरोपीला जाब विचारण्यासाठी
गेले असता त्याने तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी (Threats to Kill) दिली. फिर्यादी यांनी तक्रार देताच
पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.

Related Posts