IMPIMP

Thane Crime News | माजी महापौराच्या भावाने गोळी झाडून पत्नीचा केला खून; त्यानंतर भावाचाही मृत्यु

by sachinsitapure
Murder Case

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Thane Crime News | ठाण्याचे माजी महापौर गणेश साळवी (Former Mayor Ganesh Salvi) यांचा मोठा भाऊ व बांधकाम व्यावसायिक दिलीप साळवी यांनी आपल्या पत्नीवर गोळी झाडून तिचा खून (Murder Case) केला. त्यानंतर त्यांचा ही मृत्यु आहे. ही घटना कळव्यातील मनीषानगरमधील कुंभारआळीत शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. (Thane Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

दिलीप साळवी हे बांधकाम व्यावसायिक (Construction Professionals) होते. प्रमिला साळवी असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप आणि त्यांची पत्नी प्रमिला यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु होता. हे दोघे घरात असताना शुक्रवारी रात्री त्यांच्यात वाद झाला. तेव्हा रागाच्या भरात दिलीप याने पत्नीवर गोळी झाडून तिचा खून (Murder in Thane) केला. गोळीबाराचा आवाज ऐकून सर्वांनी तिकडे धाव घेतली. दरवाजा उघडल्यानंतर दिलीप साळवी हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. त्यामुळे पत्नीवर गोळी झाडल्यानंतर त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केल्याचा संशय आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. परंतु, तोपर्यंत त्यांचा मृत्यु झाला होता. दिलीप साळवी यांच्या अंगावर कोणत्याही जखमा नव्हत्या. त्यामुळे गोळी लागून त्यांचा मृत्यु झाला नसल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. गोळीबार केल्यानंतर त्यांना हार्ट अ‍ॅटक (Heart Attack) आला व ते रक्ताच्या थारोळ्यात पडले असावेत, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला गेला. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्युचे नेमके कारण समोर येईल़, असे पोलिसांनी सांगितले. (Thane Crime News)

पत्नी प्रमिला आणि दिलीप साळवी यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
शवविच्छेदनानंतरच दिलीप साळवी यांच्या मृत्युचे कारण समोर येऊ शकते.
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील (Additional CP Mahesh Patil),
पोलीस उपायुक्त गणेश गावडे (DCP Ganesh Gawde), सहायक पोलीस आयुक्त विलास शिंदे (ACP Vilas Shinde),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात (Senior PI Kanhaiya Thorat) यांनी घटनास्थळाला भेट दिली.
दिलीप साळवी यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Posts