IMPIMP

Pune Crime News | पुण्यातील धक्कादायक घटना! अल्पवयीन मुलांकडून तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

by sachinsitapure
murder

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये खुनाचे (Pune Murder Case) सत्र सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी मंगला टॉकीज समोर टोळक्याने एकाचा खून केला होता. त्यानंतर आता पुण्यातील वानवडी (Wanwadi) परिसरात एका तरुणाचा टोळक्याने दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना (Pune Crime News) शनिवारी (दि.2) पहाटे एकच्या सुमारास काळेपडळ संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिराच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर घडली आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

महादेव रघुनाथ मोरे Mahadev Raghunath More (वय-25 रा. काळेपडळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या गुन्ह्यात पाच अल्पवयीन मुलांचा समावेश असून पोलिसांनी (Pune Police) मुलांना ताब्यात घतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांना
ताब्यात घेण्यात आले आहे. हा खून नेमक्या कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे अद्याप समजू शकले नाही. पोलीस तपास करीत आहेत.

Related Posts