IMPIMP

Pune Crime News | आर्मी स्कुलमध्ये अ‍ॅडमिशन करुन देण्याच्या बहाण्याने फसवणूक, पुण्यातील घटना

by sachinsitapure
Cheating Fraud Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | मुलीचे आर्मी स्कुल मुंबई येथे अ‍ॅडमिशन (Army School Admission) करुन देतो असे सांगून फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने संबंधित महिलेकडून ऑनलाईन पैसे घेऊन फसवणूक केली. हा प्रकार 9 एप्रिल 2022 ते 13 एप्रिल 2022 या दरम्याने फिर्यादी यांच्या शिवाजीनगर येथील राहत्या घरी ऑनलाइन घडला. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत टिना सुरेश होटवानी (वय-43 रा. नवरीर तानाजी सोसायटी, शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) सोमवारी (दि.30) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नवजीत सिंग (रा. माहित नाही) याच्यावर आयपीसी 420, 406 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचा मित्र आहे. त्याने फिर्यादी यांच्या मुलीचे आर्मी स्कुल मुंबई
येथे अ‍ॅडमिशन करुन देतो असे सांगून विश्वास संपादन केला. फिर्यादी यांनी नवजीत सिंग याच्यावर विश्वास ठेऊन
वडिलांच्या बँक खात्यातून गुगल पे (Google Pay) द्वारे पाच वेळा पैसे पाठवले. फिर्यादी यांनी आरोपीला 91 हजार 145
रुपये ऑनलाईन पठवले. पैसे दिल्यानंतर अ‍ॅडमिशन झाले नाही. आरोपीने पैसे घेऊन अ‍ॅडमिशन न करता तसेच पैसे परत न करता फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. या तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी नवजीत सिंग याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नाईकवडे (PSI Naikwade) करीत आहेत.

Related Posts