Maratha Reservation | देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का! मराठा आरक्षणासाठी भाजपा आमदाराचा राजीनामा
बीड : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्यभर मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) वणवा पेटू लागला आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. तर दुसरीकडे आंदोलनाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची आमरण उपोषणाच्या सहाव्या दिवशी प्रकृती अत्यावस्थ झाली आहे. मराठा आंदोलकांचा (Maratha Reservation) रोष मराठा नेत्यांवर व्यक्त होऊ लागल्याने मराठा सरपंच, आमदार, खासदारांनी राजीनामा देण्याचे सत्र सुरू केले आहे. आज भाजपाच्या (BJP) एका आमदाराने राजीनामा दिला आहे. हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मोठा धक्का मानला जात आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
टिकणारे आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मागितल्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. परंतु सरकारने विश्वासघात करत ४० दिवसानंतर आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यास सुरूवात करून आंदोलनात गडबड करण्याचा प्रयत्न केला यामुळे जरांगे यांच्यासह संपूर्ण मराठा समाज संतापला आहे. आता गावोगावी साखळी उपोषण आणि राजकीय नेत्यांना गावबंदी केली जात असल्याने वातावरण तणावाचे होत चालले आहे.
बीडच्या गेवराई विधानसभा मतदारसंघाचे (Gevrai Assembly Constituency) भाजपाचे आमदार लक्ष्मण पवार
(BJP MLA Laxman Pawar) यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे.
त्यांनी राजीनाम्यात म्हटले आहे की, महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.
या विषयावर समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत. या मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) माझा
पाठिंबा आहे. मराठा आरक्षणासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.
मराठा आंदोलनाची धग आता राजकीय नेत्यांच्या घरापर्यंत पोहचली आहे. माजलगाव येथे आमदार प्रकाश सोळंके
यांच्या निवासस्थानी आंदोलकांनी दगडफेक करून वाहनांची जाळपोळ केली. त्यामुळे मराठा आंदोलनाला बीडमध्ये
हिंसक वळण लागले आहे.
Comments are closed.