IMPIMP

Pune Crime News | बनावट कागदपत्रांव्दारे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील पोलिस कर्मचार्‍याविरूध्द गुन्हा

by sachinsitapure
Pune Crime News | A case has been filed against a police officer in Pune for defrauding the government through forged documents

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | भुकंपग्रस्त नसताना बनावट कागदपत्रे (Fake Documents) सादर करुन भुकंपग्रस्त कोट्यातून पोलीस भरती (Police Recruitment) होऊन शासनाची फसवणूक (Cheating Case) केलेल्या पोलीस शिपायावर (Police Constable) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

पोलीस शिपाई गोविंद मधुकर इंगळे (Police Constable Govind Madhukar Ingle) असे गुन्हा दाखल केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. सध्या त्याची नेमणूक शिवाजीनगर मुख्यालयात (Shivajinagar Police Headquarters) आहे.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक प्रविण संपतराव अब्दागिरे (Assistant Police Inspector Pravin Sampatrao Abdagire) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७०/२३) दिली आहे. हा प्रकार ऑक्टोबर २०२१ पासून घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२१ मध्ये शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात
पोलीस शिपाई भरती घेतली होती. त्यात गोविंद इंगळे याने भुकंपग्रस्त कोट्यातून अर्ज केला होता. त्यात त्याची निवड झाली.
त्याच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यावर त्याने बनावट कागदपत्र सादर करुन भुकंपग्रस्त कोट्यातून
नोकरी मिळविल्याचे दिसून आल्यावर शासनाची फसवणूक (Government Fraud) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक नाईक (Assistant Police Inspector Naik) तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | A case has been filed against a police officer in Pune for defrauding the government through forged documents

Related Posts