IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : औषधांच्या नावाखाली अवैध मद्याची वाहतूक ! सासवड राज्य उत्पादन शुल्ककडून मुळशीत 57 लाखाचा माल जप्त

by nagesh
 Pune Crime News | Illegal liquor traffic in the name of medicine! Goods worth 57 lakhs seized in Mulshi by Saswad Division of Maharashtra State Excise Dept

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime News | औषधांच्या नावाखाली अवैध मद्याची वाहतूक करणार्‍या रॅकेटचा राज्य उत्पादन शुल्कच्या (Maharashtra State Excise department) सासवड विभागाने (Saswad Division) पर्दाफाश केला आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) मौजे माले गावचे हद्दीतील हॉटेल लाल मिर्चच्या (Hotel Lal Mirchi) समोरील पुणे-माणगाव हायवे (Pune Mangaon Highway) रोडवरील 6 चाकी ट्रकमधून तब्बल 46 लाख 67 हजार 520 रूपयाचा माल जप्त केला आहे (Pune Crime News). पथकाने एकुण 57 लाख 25 हजार 520 रूपयाचा माल जप्त करून दोन आरोपींना अटक केली आहे. (Maharashtra State Excise busts racket of smuggling illegal liquor under the guise of medicine)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दानाराम चुनाराम नेहरा (Danaram Chunaram Nehra) आणि रूखमनाराम खेताराम गोदरा (Rukhmanaram Khetaram Godra) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक चरणसिंग बी. राजपुत (Charan Singh Rajput) यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्कच्या सासवड विभागातील निरीक्षक पी.सी. शेलार (Inspector P.C. Shelar) आणि त्यांच्या पथकाने सोमवारी धडक कारवाई केली.

 

पथकाने मुळशी तालुक्यातील मौजे माले गावचे हद्दीतील हॉटेल लाल मिर्चच्या समोरील पुणे-माणगाव हायवे रोडवर थांबलेल्या एका 6 चाकी ट्रकचालकाकडे चौकशी केली. त्याने ट्रकमध्ये औषधे आणि इंजक्शन असल्याबाबत सांगितले. पथकाने संशय आल्याने तपासणीस सुरूवात केली असता ट्रकमध्ये गोवा राज्य निर्मित इंपेलियल ब्लु व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 8640 बाटल्या (180 बॉक्स), मेकडावेल नं 1 व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या 2640 सिलबंद बाटल्या (55 बॉक्स), रॉयल स्टॅग व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या 5520 सिलबंद बाटल्या (155 बॉक्स), रॉयल चायलेंज व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या 864 सिलबंद बाटल्या (18 बॉक्स), एडरियल व्हिस्की 750 मिली. क्षमतेच्या 3060 सिलबंद बाटल्या (255 बॉक्स) आढळल्या. राज्य उत्पादन शुल्कच्या सासवड विभागाने सर्व माल आणि ट्रक असा एकुण 57 लाख 25 हजार 520 रूपयाचा माल जप्त केला आहे. (Pune Crime News)

 

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी (IAS Dr Vijay Suryawanshi) , सो.मा. संचालक (अं.व.द.) सुनिल चव्हाण (Sunil Chavan Excise Dept ) यांच्या आदेशान्वये विभागीय उप आयुक्त मोहन वर्दे (Mohan Varde Excise Dept), अधीक्षक चरणसिंग बी. राजपुत, उप अधीक्षक संजय आर. पाटील (Sanjay R. Patil Excise Dept), युवराज शिंदे (Yuvraj Shinde Excise Dept), एस.बी. जगदाळे (S.B. Jagdale Excise Dept) यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड विभागाचे निरीक्षक पी.सी. शेलार, दुय्यम निरीक्षक दीपक सुपे (Deepak Supe Excise Dept), जवान तात्या शिंदे, रणजित चव्हाण, सुनिल कुदळे, दत्तात्रय पिलावरे, भागवत राठोड, भगवान रणसुरे यांच्या पथकाने केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास निरीक्षक पी.सी. शेलार करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | Illegal liquor traffic in the name of medicine! Goods worth 57 lakhs seized in Mulshi by Saswad Division of Maharashtra State Excise Dept

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : चंदननगर पोलिस स्टेशन – तरुणीशी शारीरीक संबंध ठेवून गावाकडील मुलीसोबत फोडली सुपारी

Nandurbar Police News | नंदुरबार पोलिसांकडून तृष्णा शांतीसाठी जिल्हयात 30 ठिकाणी पाणीपोईची सोय ! पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्या संकल्पनेला उत्तम प्रतिसाद

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विमान नगर पोलिस स्टेशन – मुली बरोबर बोलू नको सांगितल्याने दुचाक्या दिल्या पेटवून

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : हडपसर पोलिस स्टेशन – महिलेचा खून करुन मृतदेह टाकला विहीरीत

 

Related Posts